Crime News, Lonavala
Crime News, Lonavala  saam tv
मुंबई/पुणे

Lonavala : 31 डिसेंबरच्या रात्री लोणावळ्यात पर्यटकांसाेबत घडलं विपरीत; चार जणांवर गुन्हा दाखल

दिलीप कांबळे

Lonavala Crime News : लोणावळ्यातील मॅग्गी पॉईट येथे रस्त्यावर गाडी का लावली असे म्हणत पर्यटकांशी वादावादी करून त्यांच्यावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार रोहन गायकवाड, इमरान शेख असे संशयित आरोपींचे नाव आहे. तर नीरज तिवारी आणि हर्ष असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. (Lonavala Latest Marathi News)

निरज तिवारी व त्याचे मित्र एकतीस डिसेंबरच्या रात्री मुंबई पुणे हायवे लगतच्या एका हॉटेलमध्ये त्यांनी खोली बुक केली होती. त्यारात्री एक वाजण्याच्या सुमारास तिवारी व हर्ष यांना भुक लागल्याने काहीतरी खाण्यासाठी मिळतंय का हे मॅग्गी पॉईट येथे दुकान उघडे असल्याने त्यांनी तेथे गाडी लावून जेवणासाठी पार्सल घेतले.

यावेळी गाडीच्या मागे तीन तरुण उभे होते. हर्ष हा पार्सलचे पैसे देत असताना त्या तरुणांनी येथे गाडी का लावली म्हणून शिविगाळ करण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा हातापायांनी मारहाण केली व नंतर कोयत्याने वार केले.

हर्ष याच्या डोक्याला मार लागून रक्तस्राव होऊ लागल्याने त्याला वाचविण्यासाठी निरज मध्ये गेला असता त्याला देखील मारहाण करण्यात आली. तसेच गाडीची देखील तोडफोड केली गेली. हर्षला सावरत निरज त्याला कसा तरी हॉटेलजवळ घेऊन गेला.

तेवढ्यात येथे आलेल्या पोलिसांनी त्यांना लोणावळ्यात (lonavala) खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस (police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Foods: उन्हाळ्यात 'या' भाजीचे सेवन शरीरासाठी ठरेल उपयुक्त

Nashik Lok Sabha Election: महाजन अचानक भुजबळांच्या भेटीला का आले? तर्क वितर्कांना उधाण, नाशकात काय घडतंय?

Today's Marathi News Live : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे पोहोचले राज ठाकरे यांच्या निवासस्थानी

Raj Thackeray Sabha: सभेआधी मोठी घडामोड! एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले, कारण काय?

Pune Crime : एकमेकांकडे बघण्यावरुन वाद? पुण्यात कोयत्याने वार करत तरुणाची हत्या

SCROLL FOR NEXT