Ajit Pawar, Chhatrapati Sambhaji Maharaj, Dharmaveer,
Ajit Pawar, Chhatrapati Sambhaji Maharaj, Dharmaveer, saam tv

Ajit Pawar News : 'अजित पवार हाय हाय...', पवारांच्या 'त्या' विधानावर बाळासाहेबांची शिवसेना - भाजप आक्रमक

विराेधकांकडून राज्यभरात आज अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध नाेंदविला जात आहे.
Published on

- तबरेज शेख

Ajit Pawar News : विराेधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यावतीने नाशकात पवार यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आंदाेलकांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विराेधात जाेरदार घाेषणा दिल्या.

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यासह अन्य महापुरुषांच्या विरोधात सातत्याने सत्ताधारी आणि विरोधकांकडून अवमान करणे सुरूच आहे. राज्यपालांनंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते असं वक्तव्य केले आहे. त्याचे पडसाद राज्यभरात (maharashtra) उमटू लागले आहेत.

Ajit Pawar, Chhatrapati Sambhaji Maharaj, Dharmaveer,
Satara News : शिंदे- फडणवीस सरकार आम्हांला घाबरले : पृथ्वीराज चव्हाण

नाशिक जिल्ह्यात भाजपाने कारंजा इथं अजित पवार यांच्या विधानाचा निषेध नाेंदविला. यावेळी आंदाेलकांनी अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यानंतर जाेरदार घाेषणा देत अजित पवारांचा निषेध करण्यात आला.

Ajit Pawar, Chhatrapati Sambhaji Maharaj, Dharmaveer,
Pimpri Chinchwad : वकिलाचा खून झाल्याचे निष्पन्न; वाकड पाेलिसांचा तपास सुरु

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या गटाकडून देखील अजित पवारांच्या विधानाचा निषेध नाेंदविण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी अजित पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com