Satara News : शिंदे- फडणवीस सरकार आम्हांला घाबरले : पृथ्वीराज चव्हाण

सातारा येथे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप सरकारवर निशाणा साधला.
prithviraj chavan, satara
prithviraj chavan, satarasaam tv

Prithviraj Chavan News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र येऊन लढणार असल्याने राज्य सरकार निवडणुका घेण्याचे धाडस दाखवत नाही असा टाेला माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) यांनी लगावला आहे. आमदार चव्हाण हे साता-यात (satara) माध्यमांशी बाेलत हाेते.

सातारा येथे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप सरकारवर निशाणा साधत टीका केली आहे. आमदार चव्हाण म्हणाले राज्यात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर आले आहेत. त्यामुळे अस्थिर परिस्थिती आहे.

prithviraj chavan, satara
Helmet Compulsion : थांबा ! पुढे पाेलिस आहेत, विना हेल्मेट वाहन चालवू नका

त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र येऊन लढणार असल्याने राज्य सरकार निवडणुका घेण्याचे धाडस दाखवत नाही. सतत या निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्याचेही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

prithviraj chavan, satara
Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी! नवीन वर्षाच्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात कडाक्याची थंडी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com