Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी! नवीन वर्षाच्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात कडाक्याची थंडी

नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे.
Maharashtra Weather
Maharashtra WeatherSaam Tv

Maharashtra Winter Update : नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. नाताळानंतर राज्यातील काही भागातील थंडी गायब झाली होती. पण गेल्या दोन दिसांपासून पुन्हा एकदा राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. वर्षाच्या पहिल्याचं आठवड्यात राज्यात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.  

Maharashtra Weather
Mumbai News : एकीकडे कोरोनाचा धोका, दुसरीकडे राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर; काय आहे कारण?

येत्या दोन दिवसांत रात्रीच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काडकाच्या थंडीमुळे ग्रामीण भागासह शहरातही शेकोट्या पेटायला सुरुवात झाली आहे.मुंबई, पुणे, नाशिक,कोल्हापुर, नागपूर, औरंगाबाद यासारख्या राज्यातील मुख्य शहरांमध्ये तापमानात कमालीची घसरण बघायला मिळाली आहे.

मुंबईतही कमालीची थंडी पडली आहे. सोमवारी मुंबईत 15.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर कुलाब्यामध्ये 18.5 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यभरातील अनेक शहरांमध्ये 11 ते 12 अंश तापमानाची नोंद झाली आहे.

Maharashtra Weather
Pune Crime : 100 रुपये दिले नाहीत म्हणून तरुणाचा हात छाटला; चतुःश्रृंगी भागातील घटना

उत्तर भारतात थंडीची लाट

उत्तर भारतातील उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यात बर्फवृष्टी सुरु आहे. तसेच दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यात देखील निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. तर पुढील काही दिवसात तनामनात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत वायव्य आणि लगतच्या मध्य भारतातील किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. यामुळे मंगळवारपर्यंत राजस्थानच्या उत्तर भागात थंडीची लाट कायम राहणार आहे. गेल्या आठवड्यात दिल्ली आणि आसपासच्या परिसरात थंडीच्या लाटेपासून काहीसा दिलासा मिळाला होता. दिल्लीत सोमवारी किमान तापमान ६ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान २० अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com