Mumbai News : एकीकडे कोरोनाचा धोका, दुसरीकडे राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर; काय आहे कारण?

राज्यातील निवासी डॉक्टरांनी आज (२ जानेवारी) पासून संप पुकारला आहे.
Doctor Strike
Doctor StrikeSaam TV

Mumbai News: वैद्यकीय क्षेत्रातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. राज्यातील निवासी डॉक्टरांनी आज (२ जानेवारी) पासून संप पुकारला आहे. या संपामध्ये राज्यातील ५ हजारांहून अधिक डॉक्टर सहभागी होणार आहेत. आपल्या मागण्यांसाठी चर्चाकरण्यासाठी सरकारला शनिवार पर्यंत वेळ देण्यात आला होता. मात्र शनिवार आणि रविवारचा दिवस गेला तरी कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने डॉक्टरांनी आता संपाचं हत्यार हाती घेतलं आहे. त्यामुळे राज्यासाठी ही मोठी चिंतेची बाब बनली आहे. (Latest Mumbai News)

मार्ड डॉक्टरांच्या संघटनेने सरकारला १ जानेवारीपर्यंत वेळ दिला होता. मात्र चर्चेसाठी सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याने त्यांनी संपाचा निर्णय घेतला आहे. मार्ड डॉक्टर संपावर गेल्याने पर्यायी सुवेधांसाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. अशात याचा फटका इतर देशांना बसण्याची शक्यता आहे. ३१ डिसेंबर रोजी चीनमध्ये मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. यामुळे रुग्ण संख्येत आणखीन भर पडली आहे. त्यामुळे या काळात आरोग्य यंत्रणा सतर्क असणे फार गरजेचे आहे. मात्र अशा प्रसंगी डॉक्टरांनी संप पुकारल्याने पुढे मोठे संकट ओढावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Doctor Strike
Mumbai : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राणी बागेला ३२ हजार पर्यटकांची भेट; मुंबई महापालिकेने केली विक्रमी कमाई

महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांच्या मध्यवर्ती मार्ड संघटनेकडून विविध समस्या आणि मागण्यांचे निवेदन वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी राज्यपाल, वैद्यकीय शिक्षण मंत्री, संबंधित विभागाचे सचिव, आयुक्त व संचालक यांच्यासोबत मार्ड संघटनेच्या बैठका झाल्या. मात्र यातून निष्पन्न काहीच होत नासल्याने मागण्या मान्य न झाल्याने आज पासून राज्य निवासी डॉक्टर राज्यव्यापी संघटना महाराष्ट्रभर संप पुकारत आहे.

Doctor Strike
Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा हायवेवर बर्निंग कारचा थरार; VIDEO पाहा

काय आहेत मार्ड डॉक्टरांच्या मागण्या

राज्यातील सर्व शासकीय, पालिका आणि महाविद्यालयांत अपुऱ्या तसेच मोडकळीस आलेल्या वसतिगृहांची डागडूजी करावी. वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या १४३२ जागांच्या पदनिर्मितीचा प्रस्ताव सरकारदरबारी रखडला आहे त्यावर निर्णय घ्यावा. सहयोगी आणि सहायक प्राध्यापकांची पदे अपुरी आहेत ती तातडीने भरावीत. तात्काळ महागाई भत्ता देण्यात यावा. सर्व वरिष्ट निवासी डॉक्टरांना समान वेतन द्यावे अशा मार्ड डॉक्टरांच्या मागण्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com