Rahul Kalate Saamtv
मुंबई/पुणे

Chinchwad By-Election: महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं! राहुल कलाटेंची माघार नाहीच; पिंपरी चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार

पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचे चित्र अखेरी स्पष्ट झाले आहे.

Gangappa Pujari

Pune News: पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचे चित्र अखेरी स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी अर्ज माघार घेतला नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे, भाजप उमेदवार अश्विनी जगताप आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी आता होणार आहे.

महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) राहुल कलाटे यांचा अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. खासदार संजय राऊत तसेच विनायक राऊत यांनीही त्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र राहुल कलाटे आपल्या उमेदवारीवर ठाम राहिले.

संभाजी बिग्रेडची निवडणुकीतून माघार...

पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत संभाजी ब्रिगेड व राहुल कलाटे यांच्या उमेदवारी अर्जांमुळे महाविकास आघाडीसमोर मोठी अडचण झाली होती. परंतु अजित पवार यांनी संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांशी शुक्रवारी चर्चा केली.

त्यानंतर सचिन अहिर यांनी या उमेदवारांची भेट घेतली. संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांशीही चर्चा केली. या नेत्यांची उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करून देण्यात आली. या सर्व घडामोडीनंतर संभाजी ब्रिगेडने या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला.

काय म्हणाले राहुल कलाटे...

बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी मुदत संपली तरी आपला अर्ज मागे घेतला नाही. याबद्दल बोलताना त्यांनी "सर्वांनी मला निवडणूक लढण्याचा आग्रह धरला. माझी सर्व तयारी पुर्ण झाली आहे. माझ्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांवरुन लोक आली आहेत. जनतेच्या भावना मी निवडणूक लढवावी, अशीच होती. त्यामुळे जनभावनेचा आदर करत मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला," अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Pimpari Chinchwad)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Tourism : वन्यजीव अभयारण्यात वसलाय किल्ला, भारतातील 'हे' ऐतिहासिक ठिकाण खूप कमी लोकांना माहितेय

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Mumbai Firing case : KRK ला पोलिसांनी घेतलं ताब्यात; अभिनेत्याने दिली गुन्ह्याची कबुली, नेमकं प्रकरण काय?

Accident : लग्नाआधी काळाचा घाला, नवरदेवाचा अपघाती मृत्यू, गर्लफ्रेंडसोबत होणार होतं लग्न

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाआधीच 'या' सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढला; किती होणार फायदा?

SCROLL FOR NEXT