Bus Saam Tv
मुंबई/पुणे

डिझेलवरील बेस्ट बस भंगारात काढणार? बेस्टने दिलं स्पष्टीकरण

या बस भांगरात काढण्या ऐवजी त्या इलेक्ट्रिक किंवा सीएनजीवर धावण्यासाठी बनवता येतील का याचा विचार सुरू आहे असं बेस्ट प्रशासनाने म्हटलं आहे.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - बेस्ट म्हणजे मुंबईची उप जीवन वाहिनी , ही बेस्ट मुंबईकरांना मुंबईच्या (Mumbai) कानाकोपऱ्यात पोहचवता असते. याच बेस्टच्या जुन्या आणि डिझेलवर चालणाऱ्या बस (Bus) भंगारात काढण्यात येणार असल्याचं सध्या समाज माध्यमांमध्ये पसरवण्यात येतं आहे. पण यावर आता बेस्टने स्पष्टीकरण दिलं आहे. 'सध्या काही समाजमाध्यमांच्या ग्रूपमधे बेस्ट डिझेलच्या बसगाड्या भंगारात काढणारच आहे, अशा वस्तुस्थितीवर आधारित नसलेल्या चुकीच्या आणि तथ्यहीन बातम्या पसरविल्या जात आहेत. या बस भांगरात काढण्या ऐवजी त्या इलेक्ट्रिक किंवा सीएनजीवर (CNG) धावण्यासाठी बनवता येतील का याचा विचार सुरू आहे असं बेस्ट प्रशासनाने म्हटलं आहे.

हे देखील पहा -

तसेच डिझेलवर चालणाऱ्या बसगाड्यांचा प्रवर्तन खर्च प्रति किमी ४० रुपये असून सीएनजीवर चालणाऱ्या बसगाड्यांचा प्रवर्तन खर्च प्रति किमी २६ रुपये आहे आणि इलेक्ट्रिकवर बसगाड्यांचा प्रवर्तन खर्च प्रति किमी ९ रुपये इतका आहे. मुंबई शहरातील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने आणि बस प्रवर्तनातील तोटा कमी करून मुंबईकरांना चांगली आणि किफायतशीर बससेवा देण्यासाठी बेस्ट उपक्रम कटिबद्ध आहे.

त्यामुळे अर्थसंकल्पात तरतूद केल्यानुसार या बसगाड्या सीएनजीवर किंवा इलेक्ट्रिकवर चालवण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यासाठी किती खर्च येईल, तसेच या बसगाड्यांची किंमत याच्या आकडेवारीचा बेस्ट प्रशासन विचार करीत आहे . सध्याच्या बसचे Life- cycle- cost analysis करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबतची संपूर्ण आकडेवारी समोर आल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

मुंबईकर जनतेला अधिक चांगली आणि सक्षम बस सेवा देण्याच्या उद्देशाने आणखी 4000 वातानुकूलित इलेक्ट्रिक बस गाड्या बेस्टच्या ताफ्यामध्ये समाविष्ट होणार आहेत. पुढील 5 वर्षाच्या कालावधीमध्ये बेस्टचा एकूण बस ताफा 10 हजार इतका होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

VIDEO : खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार कल्याणशेट्टी यांच्यात वाकयुद्ध | Marathi News

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

moravala Recipe: ‪आता घरच्या घरीच बनवा मोरावळा

Sambhajinagar News : उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगास नोटीस; १५ लाख स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मतदानाचा प्रश्न

SCROLL FOR NEXT