आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती

आज शिवसेनेची शिवजयंती मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ इथ साजरी होणार आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Updates
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti UpdatesSaam Tv

मुंबई - आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे. १९ फेब्रुवारी ही जन्म तारीख स्वीकारली असली तरी तिथी नुसार शिवभक्त फाल्गुन वद्य तृतीया दिवशी शिवजयंती साजरी करतात. यंदा फाल्गुन वद्य तृतीया ही २१ मार्च रोजी म्हणजे आज आहे . त्यामुळे आज राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह पहायला मिळणार आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Updates)

हे देखील पहा -

आज शिवसेनेची शिवजयंती मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ इथ साजरी होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, शिवसेना खासदार सचिव अनिल देसाई या प्रसंगी सकाळी नऊ ते दहा च्या दरम्यान उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे .

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Updates
टायर फुटल्याने गाडी झाडावर जाऊन आदळली; महिलेचा जागीच मृत्यू!

तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी प्रमाणे सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवाजी पार्क येथील महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com