टायर फुटल्याने गाडी झाडावर जाऊन आदळली; महिलेचा जागीच मृत्यू!

सदर घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर-साकोली मार्गावरील दांडेगाव फाट्याजवळ घडली आहे.
टायर फुटल्याने गाडी झाडावर जाऊन आदळली; महिलेचा जागीच मृत्यू!
टायर फुटल्याने गाडी झाडावर जाऊन आदळली; महिलेचा जागीच मृत्यू!SaamTvNews
Published On

भंडारा : उन्हाळ्यात रस्ते तापल्याने आणि प्रचंड उष्णतेने टायर फुटून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. टायर फुटून अपघाताची (Accident) अशीच घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्यात घडली आहे. वाहनाचा टायर फुटल्याने वॅगनर कार अनियंत्रित होऊन झाडावर आदळली. या घटनेत कारमधील (Car) वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, दोन चिमुकल्यांसह पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर-साकोली मार्गावरील दांडेगाव फाट्याजवळ घडली आहे. शालिनी शामराव चिंचकर (वय 70 रा.गडचिरोली) असे मृत महिलेचे नाव आहे. (Bhandara Accident Latest News)

हे देखील पहा :

तर, अभिषेक नंदकिशोर चिंचेकर (वय 27), कल्पना नंदकिशोर चिंचेकर (वय 44) दोन्ही रा. गडचिरोली, प्रियंका रमणकुमार काटनकर (वय 29), कु. हित रमणकुमार काटनकर (वय 4 वर्ष), कु. सोनायना रमणकुमार काटनकर (वय दीड वर्ष) तिघेही राहणार साकोली (Sakoli) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे उपचार सुरु आहेत. गडचिरोली येथील अभिषेक नंदकिशोर चिंचेकर हे त्यांच्या व्हॅगनर कार (क्रमांक MH 33 V 4733) आपल्या नातेवाईकांसोबत साकोलीकडे जात होते.

टायर फुटल्याने गाडी झाडावर जाऊन आदळली; महिलेचा जागीच मृत्यू!
कुटुंब नियोजन किट प्रकरण; दोषींवर कठोर कारवाई करणार : पालकमंत्री शिंगणे

दरम्यान लाखांदूर-साकोली (Lakhandur-Sakoli Road) महामार्गावरील दांडेगाव फाट्याजवळ अचानक गाडीचा उजवा टायर फुटल्याने गाडी रस्त्याशेजारील असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात 70 वर्षीय वृद्ध महिला शालिनी शामराव चिंचेकर रा. गडचिरोली यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती दिघोरी/ मोठी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा केला व जखमींना उपचारासाठी पाठवले. जखमींची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने पाचही जणांना ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com