Bullet Train update  saam tv
मुंबई/पुणे

Bullet Train: गुड न्यूज! बुलेट ट्रेन नवी मुंबई एअरपोर्टला जोडणार? प्रवास आणखी सुसाट आणि आरामदायी होणार

Navi Mumbai Airport: बुलेट ट्रेन नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. वाचा सविस्तर...

Priya More

Summary -

  • मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन नवी मुंबई एअरपोर्टशी जोडण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे.

  • रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर केला असून मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे.

  • बुलेट ट्रेन नवी मुंबई एअरपोर्टर प्रवाशांच्या प्रवास वेळेत बचत होणार आहे.

मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत मोठी बातमी समोर आली आहे. बुलेट ट्रेन नवी मुंबई विमानतळाला जोडली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातला प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रेल्वे, रस्ते, हवाई मार्ग असलेल्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरची निर्मिती केली जाणार आहे. प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी या कॉरिडॉर निर्मिती केली जाणार आहे. जर या प्रस्तावाला मान्यता मिळून जर बुलेट ट्रेन नवी मुंबईतील विमानतळाला जोडली गेली तर याचा प्रवाशांना चांगला फायदा होईल.

मिळलेल्या माहितीनुसार, मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडली जावी यासंदर्भातला प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला आहे. यासाठी रेल्वे, रस्ते, हवाई मार्ग असलेला एक बुलेट ट्रेन कॉरिडॉर निर्माण होईल का यावर देखील सध्या चर्चा सुरू आहे. प्रवाशांचा प्रवास सुसाट आणि सुखकारक व्हावा यासाठी हा प्रयत्न आहे. या कॉरिडॉरच्या निर्मितीमुळे प्रवासाच्या वेळेत बचत होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

मात्र रेल्वे बोर्डाकडून याबाबतच्या प्रस्तावाबाबत काहीच सांगण्यात आले नाही. पण या बाबत चर्चा सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले. या प्रोजक्टमुळे मुंबई आणि नवी मुंबईदरम्यानच्या कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. याचसोबत बुलेट ट्रेनमुळे त्यांना नवी मुंबई एअरपोर्टवर पोहचणे सोपे होईल. पण यासंदर्भात गेलेल्या प्रस्तावावर रेल्वे बोर्डाकडून नेमका काय निर्णय घेतला जाईल हे महत्वाचे ठरणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला पायाभूत सुविधा देण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकारकडून केलं जात आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रोनंतर आता मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनने जोडले जाणार आहे. याबाबत रेल्वे बोर्डाकडे हा प्रस्ताव हा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती मिळत आहे. रेल्वे बोर्डाने या प्रस्ताला मंजुरी मिळाल्यास प्रवाशांच्या प्रवास वेळामध्ये बचत होणार आहे. तसेच तीन टप्प्यात मुंबई- आमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग २०२९ पर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच कामाची सुरुवात २०२७ पासून सुरू करण्यात येणार आहे. या विमानतळाचे उद्घाटन येत्या ३० ऑक्टोबरला पीएम मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मालाडमध्ये अग्नितांडव, १५ ते २० गाळ्यांना लागली आग

Shirdi Sai Sansthan: साई संस्थेच्या 47 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; शिर्डीत खळबळ, कारण काय? VIDEO

Cancer Signs: ७ लक्षणं दिसल्यास ९० दिवसांत डॉक्टरांकडे जा, कॅन्सर मूळापासून नष्ट होणार, वाचा तज्ज्ञांनी काय सांगितलं

Samruddhi Expressway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! दोन परदेशी नागरिकांचा जागीच मृत्यू|VIDEO

'बहिणीवर बलात्कार अन् आईला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त', माजी मंत्र्यांवर बायकोचे खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT