Dombivli news Saam TV
मुंबई/पुणे

Dombivli News : कुत्र्याला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या भावा-बहिणीचा तलावात बुडून मृत्यू, डोंबिवलीतील हृदयद्रावक घटना

Dombivli News : दोघे डोंबिवली पश्चिम महाराष्ट्र नगरमध्ये राहत होते.

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

Dombivli News : Dombivli News : तलावात कुत्र्याला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या भाऊ बहिणीचा बुडून मृत्यू झाला आहे. पाण्याच्या अंदाज न आल्याने ही घटना घडली आहे. डोंबिवली दावडी परिसरातील ही हृदयद्रावक घटना आहे.

कीर्ती रविंद्रन व रणजित रविंद्रन असे मयत भाऊ बहिणीचे नाव आहे. दोघे डोंबिवली पश्चिम उमेश नगर परिसरात राहणारे होते. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

डोंबिवली पश्चिमेकडील उमेश नगर परिसरात रणजीत रवींद्रन व कीर्ती रवींद्रन हे दोघे भाऊबहीण आपल्या कुटुंबासोबत राहत होते. रणजीत हा एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात होता. तर कीर्तीने यंदा बारावीमध्ये अॅडमिशन घेतले होते. आई वडील कामानिमित्त गावी गेले होते (Latest Marathi News)

त्यांच्याकडे पाळीव कुत्रा आहे. या कुत्र्याला आंघोळ घालण्यासाठी आज दुपारच्या सुमारास रणजीत व कीर्ती हे दोघे जण स्कूटर घेऊन डोंबिवली जवळील दावडी परिसरातील तलावावर गेले होते.

तलावात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे तलावात बुडाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग मानपाडा पोलीस व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. तासाभराच्या प्रयत्नांनंतर दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्यात जोरदार पाऊस; वंदना टॉकीज परिसरात पाणी साचले

Red Alert : पुढील ४८ तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे, तब्बल २२ जिल्ह्यांना रेड अलर्ट, शक्य असेल तर घरात राहा

Success Story: विदेशात शिक्षण, लाखो रूपयांची नोकरी सोडली अन् झाला IPS, अमित जैन यांचा प्रेरणादायी प्रवास

Kaam Trikon Yog: 18 वर्षांनी बनला काम त्रिकोण योग, 'या' 3 राशींना मिळणार भरपूर पैसा

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

SCROLL FOR NEXT