Pune Crime News: पुण्यात नक्की चाललयं काय? पबमध्ये प्रवेश नाकारल्याचा राग; धारदार शस्त्राने वेटरवर हल्ला

Pune News Update: तिघेही मद्यपान करून आले आहेत हे लक्षात आल्यामुळे त्यांनी या त्यांना पबमध्ये प्रवेश नाकारला.
Pune Crime News
Pune Crime NewsSaamtv
Published On

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Mundhava Crime: पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. शुल्लक कारणावरुन पुण्यात मारामारीच्या मोठ्या घटना घडताना दिसत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहारातील मुंढवा भागात पबमध्ये प्रवेश नाकारला म्हणून तरुणांनी वेटरला बेदम मारहाण केल्याचे उघडकीस आले आहे.

Pune Crime News
Kandivali Firing: मुंबईतल्या कांदिवलीमध्ये गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू; परिसरात उडाली खळबळ

काय आहे संपूर्ण प्रकरण?

समोर आलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार शनिवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडला. "ओरीला" हा पुण्यातील मुंढवा भागात असणारा एक प्रसिद्ध पब आहे. फिर्यादी धीरेंद्र हे या ठिकाणी वेटरचे काम करतात. शनिवारी ३ अज्ञात तरुण याठिकाणी पोहचले आणि पबमध्ये प्रवेश करण्यासाठी गेटवर थांबले होते. मात्र तिघेही जण मद्यपान करून आले आहेत हे धीरेंद्र यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी या तिघांना प्रवेश नाकारला.

याचाच राग मनात धरुन रात्री २.१५ वाजता धीरेंद्र हे काम संपल्यावर त्यांच्या सहकाऱ्यासोबत घरी जात असताना तिघांनी मोटर बाईक वरून येऊन त्यांची वाट अडवली. "क्यू रे हमको एन्ट्री नही दे रहे थे" असं म्हणत प्रवेश नाकारल्याचा राग मनात ठेऊन त्यांनी धारधार शस्त्राने धीरेंद्र यांच्या हातावर आणि डोक्यात वार केले आणि तिथून पळ काढला. (Latest Marathi News)

Pune Crime News
Mumbai News : पतीपेक्षा जास्त कमावणाऱ्या पत्नीला पोटगी देण्याची गरज नाही, मुंबई सत्र न्यायलयाचा मोठा निर्णय

दरम्यान, याप्रकरणी धीरेंद्र चौहान यांनी मुंढवा पोलिस (Pune Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तक्रारीनुसार या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून या प्रकरणाचा सह पोलिस निरीक्षक संदीप जोरे अधिक तपास करत आहेत. (Pune Mundhava Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com