Kandivali Firing: मुंबईतल्या कांदिवलीमध्ये गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू; परिसरात उडाली खळबळ

Kandivali police: गोळीबाराची माहिती मिळताच घटनास्थळावर कांदिवली पोलिसांनी (Kandivali Police) धाव घेतली आहे. पोलिसांकडून तपास सुरु आहे.
Kandivali Firing
Kandivali FiringSaam Tv

संजय गडदे, मुंबई

Mumbai Crime News: मुंबईतल्या कांदिवलीमध्ये (Kandivali) गोळ्या झाडून एकाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कांदिवलीच्या लालजी पाडा या परिसरात ही गोळीबाराची (Kandivali Firing) घटना घडली. गोळीबाराची माहिती मिळताच घटनास्थळावर कांदिवली पोलिसांनी (Kandivali Police) धाव घेतली आहे. पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Kandivali Firing
10-Year-Old-Girl-Molested In Maharashtra : दहा वर्षाच्या मुलीवर तिघांचा सामुहिक अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालजी पाडा परिसरात रविवारी सकाळी ७.५७ वाजता गोळीबाराची घटना घडली. कांदिवली पश्चिमच्या लालजी पाडा येथे झालेल्या गोळीबारात मनोज सिंग चौहान नावाच्या 32 वर्षीय इमिटेशन ज्वेलरी मालकाचा मृत्यू झाला.आरोपींनी मनोजवर पिस्तुल रोखून 2 राऊंड फायर केले. गोळीबारादरम्यान पहिली गोळी चुकली तर दुसरी गोळी मनोजच्या डोक्यात लागली. ज्यात मनोजचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला.

Kandivali Firing
Mumbai Crime News: मुंबई हादरली! ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून अत्याचार; संतापजनक कृत्याने परिसरात खळबळ

गोळीबाराची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. पोलिसांनी गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. झोन 11 चे डी सी पी अजय कुमार बन्सल यांनी सांगितले की, मनोज चौहान हा लालाजी पाड्यात राहत होते. इमिटेशन ज्वेलरीसाठी काम करायचे. सकाळी आठच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली.

गोळीबाराची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मनोज चौहान यांच्यावर पिस्तुलीने गोळीबार करत असल्याचे दिसत आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. उत्तर विभागातील संपूर्ण तपास पथकामध्ये आरोपींना पकडण्यासाठी 6 पथके तैनात करण्यात आली आहेत. गेल्या सहा महिन्यातील गोळीबाराची ही दुसरी घटना आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com