NASRAPUR CHILD RAPE AND MURDER CASE: ACCUSED FOUND GUILTY, PUNE COURT TO ANNOUNCE SENTENCE ON JUNE 29 Saam tv
मुंबई/पुणे

Nasrapur Case : नसरापूर बलात्कार प्रकरणात आरोपी दोषी, सोमवारी कोर्ट शिक्षा सुनावणार

Pune Nasrapur Case Bhimaro Kamble : पुण्यातील नसरापूर येथे ३ वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावली.

Alisha Khedekar

  • नसरापूरच्या ३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात न्यायालयात सुनावणी

  • आरोपीचे गुन्हे सिद्ध

  • आरोपी भीमराव कांबळे याच्या शिक्षेबाबतचा अंतिम निर्णय २९ जून रोजी जाहीर होणार

  • पीडितेच्या आई वडिलांची फाशीची शिक्षा देण्याची मागणी

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर येथील तीन वर्षांच्या चिमुरडीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात गुरुवारी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात अंतिम सुनावणी पार पडली. या सुनावणीत ६५ वर्षीय आरोपी भीमराव कांबळे याच्याविरोधातील आरोप सिद्ध झाल्याचे न्यायालयाने नमूद केले असून, या प्रकरणातील शिक्षेबाबतचा अंतिम निकाल २९ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

१ मे रोजी सुट्टीसाठी आजीच्या गावी आलेल्या तीन वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर अत्यंत क्रूरपणे लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणानंतर परिसरात संतापाची लाट उसळली होती. तपासादरम्यान पोलिसांनी भीमराव कांबळे याला अटक केली होती. अंतिम युक्तिवादादरम्यान सरकारी पक्षाने आरोपीविरोधातील परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर तपासातील निष्कर्षांच्या आधारे हा गुन्हा निर्विवादपणे सिद्ध झाल्याचा दावा केला.

आरोपीचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास लक्षात घेता तो समाजासाठी धोकादायक असून त्याच्यात सुधारणा होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. यापूर्वीच्या दोन गंभीर प्रकरणांत तो कायदेशीर प्रक्रियेमुळे सुटला होता, मात्र यावेळी त्याला कठोरातील कठोर शिक्षा म्हणजे फाशीच दिली जावी, अशी मागणी करण्यात आली.

दुसरीकडे सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी आरोपीच्या वर्तनावरही भाष्य केले. आरोपीला स्वतःची बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता. न्यायालयाने त्याला अनेक प्रश्न विचारले, मात्र त्याने कोणतीही स्पष्ट उत्तरे दिली नाहीत. आरोपीची मानसिक स्थिती आणि लैंगिक क्षमता यासंदर्भातील वैद्यकीय अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात आले असून त्यातून आरोपी मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे तसेच लैंगिक कृत्य करण्यास सक्षम असल्याचे स्पष्ट झाल्याचे नमूद करण्यात आले. आता या अत्यंत संवेदनशील आणि चर्चेतील प्रकरणात न्यायालय २९ जून रोजी शिक्षेबाबत अंतिम निर्णय देणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Serial : ४ वर्षांचा प्रवास अखेर संपणार; लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, चाहते नाराज

Maharashtra News Live Update: पुणे सत्र न्यायालयाने नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल २९ जूनला देणार

Lohgad Case: ‘केतन जिवंत आहे’ ऐकताच सियाचा थरकाप उडाला थरकाप; लोहगड तरूणाच्या हत्येप्रकरणी मोठा गौप्यस्फोट समोर

Qutb Minar : जगातील सर्वात उंच विटांची मिनार! कुतुब मिनारला 'कुतुब' नाव कसे मिळाले? वाचा खास कनेक्शन

लाल, पिवळी की हिरवी? वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसणं शुभ

SCROLL FOR NEXT