Pune Heavy Rain Update: Saamtv
मुंबई/पुणे

Jayant Patil News: 'समुद्र नाही याची पुणेकरांना खंत होती; म्हणून भाजपने आणून दाखवला' पावसाने झोडपल्यानंतर जयंत पाटील बरसले!

Pune Heavy Rain Update: स्मार्ट सिटीचा गाजावाजा करणाऱ्या पुण्यात नालेसफाई न झाल्याचाही मोठा फटका बसला. यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

Gangappa Pujari

पुणे, ता. ९ जून २०२४

पुणे शहरात कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. अवघा तासभर पडलेल्या या पावसाने शहरातील अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आल्याचे पाहायला मिळाले. शहरातील पर्वती, डेक्कन पाषाण परिसरात तुफान पाऊस कोसळला. या पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याने तसेच अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटनांनी नागरिकांना त्रास सहन करावा लागला. स्मार्ट सिटीचा गाजावाजा करणाऱ्या पुण्यात नालेसफाई न झाल्याचाही मोठा फटका बसला. यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

काय म्हणालेत जयंत पाटील?

"काल पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसात संपूर्ण पुणे शहर जलमय झाल्याची दृश्ये मी पाहिली. रस्त्यांवरून अक्षरशः नद्या वाहत होत्या. संपूर्ण चौकच्या चौक पाण्यात बडून गेले होते. अनेक चार चाकी गाड्या देखील पाण्यात पूर्णपणे बुडाल्या होत्या. अवघ्या दोन तासांच्या पावसात पुणे शहराची ही अवस्था झालेली आहे" असे जयंत पाटील म्हणाले.

तसेच "पुणे महानगरपालिकेमध्ये सलग पाच वर्ष सत्तेत राहून तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी काय विकास केला हे आज सिद्ध झाले. पुण्यात समुद्र नाही याची पुणेकरांना कायम खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला," असा खोचक टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

दरम्यान, पुण्यातील काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनीही भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. "पाऊस झाला मोठा, नालेसफाई घोटाळा झाला खोटा... आजच्या एका दिवसाच्या पावसात स्मार्टसिटीची अक्षरशः दाणादाण उडाली आहे. सर्वच रस्त्यांवर पाणी साचले आहे. पुढच्या ५० वर्षाचा विचार करून केलेला विकास तातडीने पाण्याखाली गेला आहे," अशी टीका रविंद्र धंगेकर यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: रात्री आईवडिलांना झोपेच्या गोळ्या द्यायची, नंतर बॉयफ्रेंडसोबत...; आठवीच्या विद्यार्थिनीचा धक्कादायक प्रकार

Maharashtra Live News Update : प्रचारादरम्यान पैसे वाटले, डोंबिवलीत धक्कादायक प्रकार

Love at first sight: या ३ राशींच्या व्यक्तींना पहिल्याच नजरेत होतं प्रेम

Congress: काँग्रेस आमदाराला बलात्कार प्रकरणी अटक, लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध, धमकी अन् गर्भपात

Maharashtra Politics: माजी आमदार सपकाळांनंतर आणखी एका निष्ठावंत शिलेदाराने सोडली साथ, उद्धव ठाकरेंना पुन्हा एक धक्का

SCROLL FOR NEXT