Pune Accident: भयंकर! कारच्या धडकेत गरोदर महिला हवेत फुटबॉलसारखी उडाली; घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

Pregnant Woman Hit By Unknown Vehicle Incident Caught On CCTV: पुण्यामधून एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. गरोदर महिलेला अज्ञात वाहनाने धडक दिली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
भीषण अपघात
Pune AccidentSaam Tv

रोहिदास गाडगे, साम टीव्ही पुणे

पुण्याच्या निघोजेमध्ये अज्ञात वाहनाने गर्भवती महिलेला पाठीमागून जोरात धडक देऊन जखमी केलं आहे. या घटनेचा थरार जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमरात कैद झाला आहे. श्रद्धा येळवंडे, असं जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे. संबधित कारने महिलेला उडवलं आहे. यावेळी महिला फुटबॉलसारखी उडाल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा अपघात पाहून अंगावर काटाच येतो.

अपघातात जखमी झालेल्या श्रद्धा येळवंडे या गर्भवती आहेत. त्यांचं बाळ सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली (Pune Accident News) आहे. अज्ञात वाहन चालकाचा पिंपरी-चिंचवडचे महाळुंगे पोलीस शोध घेत आहेत. हा अपघात शनिवारी (८ जून) रोजी सायंकाळी घडला आहे. अपघाताचं भीषण दृश्य सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झालं आहे. कारच्या धडकेत महिला फुटबॉलसारखी उडाल्याचं दिसत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास देहू-निघोज या रस्त्यावर बालिंगवस्ती या ठिकाणी श्रद्धा येळवंडे या रस्त्याच्या कडेने डाव्या बाजूने चालत जात होत्या. त्यावेळी भरधाव वेगातील कारने त्यांना पाठीमागून जोरात धडक (Pregnant Woman Hit By Unknown Vehicle) दिली. या धडकेत श्रद्धा येळवंडे उडून खाली पडल्याचं दिसत आहे. गाडी अतिशय भरधाव वेगात असल्याचं समोर आलं आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

भीषण अपघात
Kolhapur Accident News: हृदयद्रावक! भरधाव डंपरची दुचाकीला धडक; पती- पत्नीचा करुण अंत; कोल्हापुरमधील घटना

या अपघातात श्रद्धा येळवंडे जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं (Accident News) आहे. दरम्यान, धडक दिल्यानंतर कार चालक न थांबताच त्या ठिकाणाहून फरार झाला आहे. याप्रकरणी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन चालकाचा महाळुंगे पोलीस शोध घेत आहेत. ही महिला दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावली असल्याचं समोर आलं आहे.

भीषण अपघात
Nanded Accident News: नांदेडमध्ये भीषण अपघात; दुचाकी दीड किलोमीटर फरफटत नेली, एकाचा मृत्यू, अपघातानंतर ट्रक पेटली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com