Kolhapur Accident News: हृदयद्रावक! भरधाव डंपरची दुचाकीला धडक; पती- पत्नीचा करुण अंत; कोल्हापुरमधील घटना

Kolhapur- Ratnagiri Accident News: कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील पती- पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Kolhapur Accident News: हृदयद्रावक! भरधाव डंपरची दुचाकीला धडक; पती- पत्नीचा करुण अंत; कोल्हापुरमधील घटना
Kolhapur- Ratnagiri Accident News: Saamtv

रणजित माजगावकर, कोल्हापूर| ता. ८ जून २०२४

कोल्हापुरमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावर भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात पती- पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरील बोरपाडळे इथे डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील पती - पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मारुती रामचंद्र महाजन आणि सुगंधा मारुती महाजन हे आपल्या ॲक्टीव्हा गाडीवरुन निघाले होते. यावेळी बोरपाडळे इथे त्यांच्या दुचाकीला भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. डंपरवरील चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Kolhapur Accident News: हृदयद्रावक! भरधाव डंपरची दुचाकीला धडक; पती- पत्नीचा करुण अंत; कोल्हापुरमधील घटना
PM Modi Oath Ceremony: तारीख, वेळ अन् ठिकाण ठरलं! नरेंद्र मोदी करणार पंतप्रधानपदाची हॅट्रिक; कसा पाहाल NDA सरकारचा शपथविधी सोहळा? वाचा सविस्तर...

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कोल्हापुर शहरात हीट अँड रन अपघात समोर आला होता. शहरातील चौकात एका भरधाव कारने सहा ते सात वाहनांना चिरडल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला होता.

Kolhapur Accident News: हृदयद्रावक! भरधाव डंपरची दुचाकीला धडक; पती- पत्नीचा करुण अंत; कोल्हापुरमधील घटना
Sangli Crime: धक्कादायक! बांधकाम कामगारावर जीवघेणा हल्ला, कोयत्याने डोक्यात वार; हल्लेखोर फरार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com