PM Modi Oath Ceremony: तारीख, वेळ अन् ठिकाण ठरलं! नरेंद्र मोदी करणार पंतप्रधानपदाची हॅट्रिक; कसा पाहाल NDA सरकारचा शपथविधी सोहळा? वाचा सविस्तर...

Indian Prime Minister Oath Ceremony 2024 All Details: देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी उद्या तिसऱ्यांदा शपथ घेतील. एनडीए सरकारच्या या खास शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. कसा असेल हा खास सोहळा? घरबसल्या कसा पाहाल? जाणून घ्या एका क्लिकवर
PM Modi Oath Ceremony: तारीख, वेळ अन् ठिकाण ठरलं! नरेंद्र मोदी करणार पंतप्रधानपदाची हॅट्रिक; कसा पाहाल NDA सरकारचा शपथविधी सोहळा? वाचा सविस्तर...
Prime Minister Oath Ceremony 2024 Details:Google

दिल्ली, ता. ८ जून २०२४

देशात सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. उद्या (९ जून) सायंकाळी सहा वाजल्यापासून एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी असून जगभरातील दिग्गजांना या खास सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. कसा असेल हा खास कार्यक्रम? कसा पहाल नव्या सरकारचा शपथविधी? जाणून घ्या सविस्तर.

देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार!

लोकसभा निवडणुकानंतर देशात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होणार आहे. रविवारी ९ जून सायंकाळी ७.१५ वाजता राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांचा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. या कार्यक्रमासाठी देशासह परदेशातील ९,००० पेक्षा जास्त मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे.

दिग्गज परदेशी पाहुण्यांना निमंत्रण

यामध्ये श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड', भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आदी मान्यवरांचा यामध्ये समावेश आहे.

PM Modi Oath Ceremony: तारीख, वेळ अन् ठिकाण ठरलं! नरेंद्र मोदी करणार पंतप्रधानपदाची हॅट्रिक; कसा पाहाल NDA सरकारचा शपथविधी सोहळा? वाचा सविस्तर...
Nashik Accident: नाशिकमध्ये भीषण अपघात! ट्रॅव्हल्स- ट्रकची समोरासमोर धडक, १ जागीच ठार; ७ जखमी

देशातील अनेक नामांकित व्यक्तींना निमंत्रण

परदेशी पाहुण्यांसह देशातील वकील, डॉक्टर, कलाकार, सांस्कृतिक कलाकार आणि प्रभावशाली अशा विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तीही एनडीए सरकारच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार आहेत. यामध्ये विकसित भारताचे राजदूत, केंद्र सरकारच्या योजनांचे लाभार्थी, आदिवासी महिला आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश आहे. तसेच विविध धर्मातील सुमारे 50 प्रतिष्ठित धार्मिक नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

कशी असेल सुरक्षा व्यवस्था?

नरेंद्र मोदींच्या या शपथविधी सोहळ्यानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी 9 आणि 10 जून रोजी राजधानीत नो-फ्लाय झोन घोषित केला आहे. तसेच सुरक्षेसाठी एसपीजी, राष्ट्रपती सुरक्षा रक्षक, आयटीबीपी, दिल्ली पोलिस, गुप्तचर विभागाचे पथक, निमलष्करी दल, एनएसजी ब्लॅक कॅट कमांडो आणि एनडीआरएफचे पथक उपस्थित राहणार आहेत.

PM Modi Oath Ceremony: तारीख, वेळ अन् ठिकाण ठरलं! नरेंद्र मोदी करणार पंतप्रधानपदाची हॅट्रिक; कसा पाहाल NDA सरकारचा शपथविधी सोहळा? वाचा सविस्तर...
Ratnagiri News: वाळू माफियांची दादागिरी! महिला उपजिल्हाधिकांऱ्यावर हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

कसा पाहाल शपथविधी सोहळा?

एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा टीव्हीवर पाहण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सायंकाळी सहा वाजल्यापासून साम टीव्हीच्या युट्यूब, फेसबूक पेजवर तसेच साम टीव्हीवरही शपथविधीचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल. तसेच ऑनलाई पाहणार असाल तर भारतीय जनता पक्षाचे अधिकृत युट्यूब पेज, नरेंद्र मोदी यूट्यूब पेज आणि पक्षाशी संबंधित इतर सर्व ऑनलाइन माध्यमांवर तुम्ही हा कार्यक्रम पाहू शकता.

PM Modi Oath Ceremony: तारीख, वेळ अन् ठिकाण ठरलं! नरेंद्र मोदी करणार पंतप्रधानपदाची हॅट्रिक; कसा पाहाल NDA सरकारचा शपथविधी सोहळा? वाचा सविस्तर...
Chhatrapati Sambhajinagar: 'कुत्र्याला रस्त्यावर फिरवू नको', आईने अडवल्याचा राग, एकुलत्या एका मुलाने संपवलं आयुष्य; मन सुन्न करणारी घटना!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com