Mumbai Police Preventive Order For Gokulashtami 2024: Saamtv
मुंबई/पुणे

Gokulashtami 2024: अश्लील गाण्यांवर बंदी, पाणी, गुलाल उडवल्यास कारवाई; मुंबई पोलिसांकडून गोकुळाष्टमीसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी, वाचा सविस्तर..

Mumbai Police Preventive Order For Gokulashtami 2024: मुंबईमध्ये मोठमोठ्या दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. सोमवारी (२६, ऑगस्ट) गोकुळाष्टमी साजरी केली जाणार असून मुंबई पोलिसांकडून याबाबत आदेश अन् नियम जारी करण्यात आले आहेत.

Gangappa Pujari

सचिन गाड| मुंबई, ता. २२ ऑगस्ट २०२४

Dahi Handi News Updates: श्रावण पोर्णिमा, रक्षाबंधननंतर आता सर्व गोविंदांना श्रीकृष्ण जन्माष्ठमी, गोकुळाष्ठमी म्हणजेच दहिहंडीच्या उत्सवाचे वेध लागले आहेत. महाराष्ट्रामध्ये दहिहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला होता. विशेषता मुंबईमध्ये मोठमोठ्या दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. सोमवारी (२६, ऑगस्ट) गोकुळाष्टमी साजरी केली जाणार असून मुंबई पोलिसांकडून याबाबत आदेश अन् नियम जारी करण्यात आले आहेत.

गोकुळाष्टमीसाठी प्रतिबंधात्मक आदेश

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यभरातील गोविंदांना दहिहंडीच्या उत्सवाचे वेध लागले आहेत. सोमवार, २६ ऑगस्टला मुंबईमध्ये दहिहंडीचा जल्लोष अन् उत्साह पाहायला मिळणार आहे. या उत्सवाच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीसही सज्ज झाले असून गोकुळाष्टमीनिमित्त मुंबई पोलिसांनी मार्गदर्शक नियमावली अन् आदेश जारी केले आहेत. मुंबई पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी यासंदर्भातील परीपत्रक काढले आहे.

पादचाऱ्यांवर पाणी ओतणे, पाण्याचे फुगे मारणे तसेच गुलाल उधळण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिकरित्या अश्लील शब्दांचा उच्चार करणे, घोषणाबाजी करणे तसेच अश्लील गाणी गाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. २६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून २७ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत आदेश लागू होणार आहेत. नियमांच उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनिमंतर्गत कारवाई होणार आहे.

काय आहेत आदेश?

(१) सार्वजनिकरित्या अश्लील शब्दांचे उच्चार किंवा घोषणा किंवा अश्लील गाणी गाणे.

(२) हातवारे किवा नक्कल प्रस्तुतीकरणांचा वापर आणि तयार प्रतिमा, चिन्हे, फलक, किंवा इतर कोणत्याही वस्तू किंवा गोष्टींचे प्रदर्शन किंवा प्रसार करणे ज्यामुळे प्रतिष्ठा, शालीनता किंवा नैतिकता दुखावते.

(३) पादचाऱ्यांवर रंगीत पाणी किंवा फवारे, रंग किंवा पावडर फवारणे किंवा फेकणे

(४) रंगीत किंवा साध्या पाण्याने किंवा कोणत्याही द्रवाने भरलेले फुगे तयार करणे किंवा फेकणे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

SCROLL FOR NEXT