DSK DS Kulkarni Latest News
DSK DS Kulkarni Latest News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: मोठी बातमी! डी.एस. कुलकर्णी यांच्या पुण्यातील कार्यालयावर ईडीची छापेमारी; अधिकाऱ्यांकडून झाडझडती

Satish Daud-Patil

नितीन पाटणकर, साम टीव्ही पुणे

DSK DS Kulkarni Latest News

पुणे शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्या पुण्यातील कार्यालयावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. मुंबईतून आलेले ईडीचे पथक शुक्रवारी (ता १९) पहाटेपासूनच डी.एस. कुलकर्णी यांच्या जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या कार्यालयाची झाडझडती घेत आहेत. उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांच्यावर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

पुण्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात त्यांना अटक झाली होती. ५ वर्षांनंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती. मात्र, त्यांच्या अडचणी काही संपेनात. ईडीच्या कचाट्यात ते सापडले आहेत. मुंबईवरून आलेल्या ईडीच्या पथकाने त्यांच्या पुण्यातील कार्यालयावर आज, शुक्रवारी सकाळीच धाड टाकली.

सकाळपासूनच कार्यालयाची झाडाझडती

डी. एस. कुलकर्णी यांच्या कार्यालयावर ईडीनं आज सकाळीच छापा मारला. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर त्यांचे कार्यालय आहे. मुंबईवरून आलेल्या ईडीच्या पथकाकडून सकाळपासून कार्यालयाची झाडाझडती सुरू आहे, असे सांगितले जाते. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कुलकर्णी यांच्यावर पुण्यातील वेगवेगळ्या पोलिसांत अनेक गुन्हे दाखल आहेत.

'डीएसके यांच्या मालमत्तेबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या'

बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करुन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाला दिले आहेत. लिलावामधील योग्य मालमत्तेची यादी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने तीन आठवड्यात तयार करावी, असंही उच्च न्यायालयाने सांगितलं आहे.

डीएसके यांच्या १९५ स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. या मालमत्तेचा लवकरात लवकर लिलाव करुन ३५ हजार गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावे यासाठी याचिका दाखल करण्यात आली. जप्त केलेल्या १९५ स्थावर मालमत्तांचा लिलाव करण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज मावळ-मुळशीचे उपविभागीय दंडाधिकारी सुरेंद्र नवले यांनी येथील विशेष न्यायालयात केला. या सुनावणी घेताना मुंबई उच्च न्यायालयाने हा निकाल दिलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : सांगलीत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान आक्रमक; तीन कॅफेशॉप फोडले

High Calcium Foods : दूधापेक्षा जास्त कॅल्शिअम असलेले पदार्थ; लहान मुलांच्या बुद्धीला चालना मिळेल अन् हाडं होतील मजबूत

MI Playing XI: आज अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार? LSG विरुद्ध अशी असेल मुंबईची प्लेइंग ११

Buldhana: ज्वारी खरेदीच्या निकषामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप, नोंदणी कार्यालयात तुडुंब गर्दी

Bribe Case : सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एसीबीच्या ताब्यात; मजुरांचे पैसे काढण्यासाठी मागितली ५ हजारांची लाच

SCROLL FOR NEXT