Jyoti Waghmare
Jyoti Waghmare Criticized Sanjay RautSaam Tv

Maharashtra Politics: बाळासाहेब असते तर संजय राऊतांना जोड्याने हाणलं असतं; ज्योती वाघमारे असं का म्हणाल्या?

Jyoti Waghmare Criticized Sanjay Raut: बाळासाहेब असते तर संजय राऊतांना जोड्याने हाणलं असतं, अशी टिका शिवसेना प्रवक्त्या प्रा. डॉ.ज्योती वाघमारे यांनी केली आहे.
Published on

सूरज मसुरकर साम टीव्ही, मुंबई

शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी नवनीत राणांवर बोलताना खालच्या पातळीची भाषा वापरली होती. त्यावरून संतप्त प्रतिक्रिया देत (sanjay raut) बाळासाहेब असते तर संजय राऊतांना जोड्याने हाणलं असतं, अशी टिका शिवसेना प्रवक्त्या प्रा. डॉ.ज्योती शिवसेना प्रवक्त्या प्रा. डॉ.ज्योती वाघमारे यांनी केली आहे.

नवनीत राणा (navneet rana) यांच्या संदर्भात संजय राऊत यांनी खालच्या पातळीची भाषा वापरली. जर बाळासाहेब ठाकरे असते, तर संजय राऊतांना जोड्याने हाणले असते. महाविकास आघाडीला लाज आणणारी वक्तव्ये संजय राऊत यांनी केलेली आहेत, असं वाघमारे (Jyoti Waghmare) म्हणाल्या आहेत.

अमरावतीत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ मेळाव्यात बोलताना, संजय राऊत यांनी "ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची, डान्सर, बबलीशी नाही तर ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र, मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, मोदी विरुद्ध शरद पवार, मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे." असं वक्तव्य केलं होतं. यावरून आता वातावरण तापल्याचं दिसतंय. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर मोठ्या प्रमाणामध्ये टीका होत आहे.

एखाद्या महिलेला नाची म्हणणे,अशी विधाने हा पुरोगामी महाराष्ट्र खपवून घेणार नाही. हा शिवछत्रपतींचा, जिजाऊ, सावत्री, रमाईचा महाराष्ट्र आहे ना, मग याच महाराष्ट्रात महिलांचा असा अपमान होताना उद्धव ( Maharashtra Politics) ठाकरे गप्प का आहेत? कित्येकवेळेला महिला सन्मानाची बात करणाऱ्या सुषमा अक्का कुठे आहात तुम्ही? या महाराष्ट्रातील दमलेल्या बाबांच्या लेकी सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे मूग गिळून का बरं गप्प आहात? का फक्त स्वत:ची बुलंद कहाणी लिहण्यात व्यस्त आहेत, असा सवाल वाघमारे यांनी केला आहे.

Jyoti Waghmare
Sanjay Raut: बंडखोरी करणाऱ्यांची पक्षाने हकालपट्टी करावी, संजय राऊतांची विशाल पाटील यांच्यावर टीका

रावण सुद्धा महाविद्वान होता. पण सीतामाईचा अपमान केला आणि रावणाची सोन्याची लंका जळाली. सामर्थ्यवान असणारं हस्तिनापूरसुद्धा द्रौप्रदीच्या अपमानाने उद्धस्त झालं होतं. महाविकास आघाडीची (Maharashtra election) लंका, ही संजय राऊताच्या अशा बेताल बडबडीमुळेच जळून जाणार आहे. कारण महाराष्ट्राला महिलांचा अपमान सहन होणार नाही. महाराष्ट्रातील महिला संजय राऊत यांची जोड्याने पुजा करतील, अशी टीका शिवसेना प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी केली आहे.

Jyoti Waghmare
Sanjay Raut News: नवनीत राणांवरील टीका संजय राऊतांना भोवणार? महिला पदाधिकाऱ्यांनी उचललं मोठं पाऊल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com