Pune Double Decker Bus:  Saamtv
मुंबई/पुणे

Pune Double Decker Bus: पुणेकरांसाठी गुड न्यूज! पीएमपीच्या ताफ्यात येणार आलिशान 'डबल डेकर' बस; अशा असतील खास सुविधा

Gangappa Pujari

सचिन जाधव, पुणे|ता. १६ जुलै २०२४

पुणेकरांसाठी एक मोठी अन् आनंदाची बातमी. पुण्यात डबल डेकर बस खरेदी करण्याच्या पीएमपीच्या प्रक्रियेला अखेर दीड वर्षाच्या खंडानंतर मुहूर्त मिळाला आहे. पुढील आठवड्यापासून ही निविदा प्रक्रिया सुरू होईल. यामध्ये २० डबलडेकरसह १०० ई-बसची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे शहरात डबल डेकर बस धावणार असल्याच्या चर्चांवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. या डबल डेकर बस खरेदी करण्याच्या पीएमपीच्या प्रक्रियेला अखेर दीड वर्षाच्या खंडानंतर मुहूर्त मिळाला आहे. त्यामुळे आता पुणेकरांच्या सेवेत लवकरच डबल डेकर बस येणार आहे.

डिसेंबर २०२२ मध्ये बसखरेदीचा निर्णय झाला होता. त्यास संचालक मंडळाने मंजुरीही दिली होती. मात्र त्यानंतर सारे ठप्प झाले. बस प्रत्यक्ष धावण्यासाठी आणखी किमान सहा महिन्यांचा अवगधी लागण्याची शक्यता आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन डबलडेकर बस सेवा सुरु करायचा निर्णय झाला होता. पहिल्या टप्यात २० बस घेतल्या जातील. या बस 'बीआरटी' मार्गावरून धावणार नाहीत.

कशी असेल नवी डबलडेकर?

नव्या बसला दोन जिने असतील. इलेक्ट्रिक व वातानुकूलित सेवा. उत्तम सस्पेन्शनमुळे प्रवास आरामदायक होणार आहे. डिजिटल तिकिटाची बसमध्येच सुविधा असेल विशेष म्हणजे या बसचा 'लुक' लंडनमध्ये धावणाऱ्या बससारखा असेल. ७० प्रवाशांची क्षमता असलेल्या या बसमध्ये एकाच वेळी किमान शंभरपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करू शकणार आहे .त्यामुळे जास्त बसची अथवा फेऱ्यांची गरज भासणार नाही. या का बसची किंमत २ कोटी रुपये असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT