Sanjay Raut: 'शंकराचार्यांचा आशीर्वाद मोठी गोष्ट, पोटशूळ उठलेल्यांना हिंदुत्व मान्य नाही', संजय राऊतांचा टीकेचा बाण!

Maharashtra Politics Latest News: न्यायालयामध्ये आमचा शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत खटला सुरू आहे. तो चालेल तेवढा चालेल. पण आदरणीय शंकराचार्यांनी आम्हाला आशिर्वाद दिले, असे संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut: 'शंकराचार्यांचा आशीर्वाद मोठी गोष्ट; पोटशूळ उठलेल्यांना हिंदूत्व मान्य नाही', संजय राऊतांचा टीकेचा बाण!
Maharashtra Politics Latest News:Saamtv
Published On

मयुर राणे, ता. १६ जुलै २०२४

ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंबियांकडून ज्योतिष्पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य यांच्या पादुकांचे पूजन केले. या भेटीनंतर बोलताना जगद्गुरु शंकराचार्य यांनी ठाकरेंशी विश्वासघात झाला, असे विधान केले होते. यावरुनच आता संजय राऊत यांनीही महत्वाचे विधान केले आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना मातोश्रीवर यायचं होतं. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्याशी विश्वासघात झाला. त्यांचा पक्ष फोडला गेला. विश्वासघाताला हिंदू धर्मामध्ये स्थान नाही, असं विधान केले. त्यांच्या या विधानाने कुणाला पोटशुळ उठलं असेल तर त्यांना हिंदू धर्म मान्य नाही. हिंदू धर्माच्या धर्मगुरूंची भूमिका मान्य नाही," असे संजय राऊत म्हणाले.

"न्यायालयामध्ये आमचा शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत खटला सुरू आहे. तो चालेल तेवढा चालेल. पण आदरणीय शंकराचार्यांनी आम्हाला आशिर्वाद दिले. आमच्यावरील अन्यायाबाबत खंत व्यक्त केली, ही मोठी गोष्ट आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा विश्वासघातांनी तुकडा पाडला, याला हिंदूत्व म्हणता येणार नाही," असे शंकराचार्य म्हणाल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.

Sanjay Raut: 'शंकराचार्यांचा आशीर्वाद मोठी गोष्ट; पोटशूळ उठलेल्यांना हिंदूत्व मान्य नाही', संजय राऊतांचा टीकेचा बाण!
NCP Politics: 'नगर आणि माढा'वरून जुंपली! निलेश लंके यांचा अजित पवारांवर पलटवार; म्हणाले, 'शिळ्या कढीला ऊत...' VIDEO

दरम्यान, महाराष्ट्र अस्वस्थ आहे. त्यामुळे सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन राज्याला दिशा देण्याची गरज आहे. निवडणुकीच्या निमित्ताने जे राजकारण पेटवलं जात आहे, ते महाराष्ट्रासाठी चांगलं नाही. शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे मार्गदर्शन महत्वाचे आहे, असे म्हणत राऊत यांनी शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या भेटीवर भाष्य केले.

Sanjay Raut: 'शंकराचार्यांचा आशीर्वाद मोठी गोष्ट; पोटशूळ उठलेल्यांना हिंदूत्व मान्य नाही', संजय राऊतांचा टीकेचा बाण!
Panvel Bus Accident : पंढरपूरला निघालेल्या भाविकांवर काळाची झडप; खासगी बस दरीत कोसळली, ५ जणांचा जागीच मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com