Pune Hospitals Threat Mail  Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : पुण्यातील ६० ते ७० रुग्णालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; ई-मेल प्राप्त होताच पोलिसांची धावपळ

Pune Hospitals Threat Mail : पुण्यातील ६० ते ७० रुग्णालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी अज्ञात व्यक्तीने ई-मेलद्वारे दिली. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली.

Satish Daud

पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलसह ६० ते ७० रुग्णालयांमध्ये बॉम्ब ठेवलाय, असा धमकीचा ई-मेल अज्ञात व्यक्तीने पाठवला. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने डेक्कन परिसरात धाव घेऊन हॉस्पिटलची तपासणी केली. यावेळी बॉम्बशोधक पथकही होते. तपासणीनंतर कुठलीही बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली नाही.

त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. बॉम्ब ठेवल्याची धमकी दिल्याचा हा खोडकरपणा नेमका कुणी केला? याचा तपास सध्या पुणे पोलिसांकडून केला जात आहे. सध्या पोलिसांचे पथक रुग्णालय परिसरात ठाण मांडून आहेत.

तसेच ज्या ई-मेलवरून रुग्णालयांना धमकी आली, त्याचे तांत्रिक विश्लेषण करण्याचे काम सुरू आहे. पुणे शहरातील डेक्कन परिसरात सह्याद्री हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या ई-मेलवर सोमवारी (ता. १७) एका अज्ञात व्यक्तीने बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा मेल पाठवला. यामुळे रुग्णालयातील डॉक्टर चांगलेच धास्तावले.

त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांची बॉम्बशोधक पथकासह रुग्णालय गाठले. यावेळी हॉस्पिटलचा कानाकोपरा तपासण्यात आला. मात्र, कुठलीही बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली नाही. दरम्यान, धमकी देणाऱ्या व्यक्तीने एकाचवेळी शहरातील ६० ते ७० रुग्णालयांने हे धमकीचे मेल पाठवले होते.

मुंबईतील रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबईतील अनेक रुग्णालयांना देखील सोमवारी अज्ञात व्यक्तीने बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. या घटनेमुळे रुग्णालयातील कर्मचारी, रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी श्वानपथकासह रुग्णालयांची तपासणी केली असता काहीच आढळून आले नाही. बॉम्बची अफवा असल्याचे स्पष्ट होताच सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातील भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले; मात्र दररोज 'इतक्याच' भाविकांना प्रवेश

Cheese Balls Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी झटपट बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट चीज बॉल्स, वाचा सोपी रेसिपी

6,600 रुपयांच्या फायद्यासाठी 22 बळी, दारूकांडाची थरारक इनसाईड स्टोरी, आरोपी वानखेडेनं कसा रचला प्लॅन?

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT