Mumbai Terror Attack Threat News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Blast Threat Call: मुंबई, पुण्याला स्फोटानं उडवण्याची धमकी, सकाळी सकाळी आलेल्या फोनमुळं खळबळ, यूपी कनेक्शन समोर

Mumbai Police Received Threat Call: तपासादरम्यान कॉलरने हा फोन उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून केल्याचे तपासातून समोर आले आहे.

Priya More

सूरज सावंत, मुंबई

Mumbai News: मुंबईत बॉम्बस्फोट (Bomb Blast) करण्याची पुन्हा धमकी देण्यात आली आहे. यावेळी फक्त मुंबईच नाही तर पुण्यामध्ये देखील बॉम्बस्फोट करण्यात येणार असल्याचा धमकीचा फोन आला आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला हा धमकीचा फोन (Mumbai Blast Threat Call) आला आहे. या फोननंतर मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हा फोन नेमका कुठून आला आणि कोणी केला याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

मुंबई पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कॉल करणाऱ्याने गुरुवारी सकाळी 10 वाजता पोलीस कंट्रोलला कॉल केला आणि दावा केला की 24 जून रोजी संध्याकाळी 6:30 वाजता मुंबईतील अंधेरी आणि कुर्ला या परिसरात बॉम्बस्फोट होणार आहेत. एवढेच नाही तर कॉलरने पुढे असा देखील दावा केला आहे की, आपल्याला दोन लाख रुपयांची गरज आहे आणि ही रक्कम मिळाल्यानंतर तो बॉम्बस्फोट थांबवू शकतो.'

धमकी देणाऱ्या या व्यक्तीने पुढे असे देखील सांगितले की, 'पुण्यातही बॉम्बस्फोट होणार आहेत आणि तो स्वत: हा स्फोट घडवून आणतोय. त्यासाठी त्याला दोन कोटी रुपये मिळाले आहेत. जर दोन लाख रुपये मिळाल्यास तो आपल्या माणसांसोबत मलेशियाला रवाना होईल, असा दावा कॉल करणाऱ्याने केला आहे. या कॉलनंतर एकच खळबळ उडाली आहे.

धमकीच्या फोननंतर पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली. तर तपासादरम्यान कॉलरने हा फोन उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून केल्याचे तपासातून समोर आले आहे. अंबोली पोलिसांनी यासंदर्भात आयपीसीच्या कलम ५०५ (१)(बी), ५०५(२) आणि १८५ अन्वये गुन्हा दाखल केला असून ते या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, मुंबई ते दिल्ली या विमान प्रवासादरम्यान फोनवर अज्ञात व्यक्तीशी विमान हायजॅक करण्याची वल्गना करत विमानात दहशत पसरवू पाहणाऱ्या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईच्या सहार पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. अटक केलेला तरुण हा मूळचा हरियाणाचा आहे. तो दिल्ली ते मुंबई विस्तारा या कंपनीच्या विमानातून प्रवास करत होता.

या प्रवासादरम्यान हा तरुण एका अज्ञात व्यक्तीला फोन लावून 'अहमदाबादचे फ्लाइट निघणार आहे. काही समस्या असेल तर मला कॉल कर. हायजॅकचे संपूर्ण प्लॅनिंग आहे. काही चिंता करु नको.' असे सांगत होता. या फोनच्या माध्यमातून त्याने विमानात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी विमानातील कर्मचाऱ्यांनी सहार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार तरुणाला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पन्नास हजार मताच्या फरकाने निवडून येणार-माधुरी मिसाळ

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

SCROLL FOR NEXT