लक्ष्मण सोळुंके, जालना
Jalna News: जालनामध्ये भाविकांच्या कारला भीषण अपघात (Jalna Car Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव कारला पिकअपने जोरदार धडक दिली. अपघातानंतर कारला भीषण आग लागली. या आगीमध्ये एका महिलाचा होरपळून मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये कार जळून खाक झाली आहे. या अपघाताचा तपास मंठा तालुका पोलिसांकडून (Mantha Taluka Police) सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेगावच्या गजानन महाराजांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या कारला पिकपने जोरदार धडक दिली. या अपघातानंतर कारला भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून कारमधील महिलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तळणी फाट्याजवळील महावीर जिनिंगसमोर पहाटे 3:55 वाजताच्या सुमारास अपघाताची ही घटना घडली. कारला लागलेल्या आगीमध्ये होरपळून सविता अमोल सोळुंके या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
जालना जिल्ह्यातल्या परतुर तालुक्यातील कऱ्हाळा गावात राहणारे अमोल गंगाधर साळुंके हे आपल्या पत्नीसोबत शेगावला दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन घराकडे परत येत असताना त्यांच्या कारला तळणी फाट्याजवळ पिकअपने जोरदार धडक दिली. अपघातानंतर अमोल सोळुंके हे कारमधून उतरुन कारला झालेले नुकसान पाहत होते. त्याचवेळी अचानक कारने पेट घेतला आणि कारचे सेंटर लॉक आतमधून लॉक झाले.
अमोल सोळुंके यांची पत्नी सविता या कारमध्येच बसल्या होत्या. कारला आग लागल्यामुळे आणि सेंटर लॉक हे लॉक झाल्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. या आगीमध्ये सविता यांचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाला. या अपघातामध्ये अमोल यांचा जीव वाचला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अपाघातामध्ये रात्रभर कार जळून खाक झाली आहे. अमोल साळुंखे यांच्या भावाच्या तक्रारीवरून मंठा तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या अपघाताच तपास पोलिसांकडून सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.