Maharashtra Monsoon Update: प्रतीक्षा संपणार? आजपासून मुसळधार पावसाची शक्यता; अनेक ठिकाणी पावसाची दमदार हजेरी

Monsoon Update: राज्यात मान्सूनच्या आगमनानंतर दडी मारुन बसलेला पाऊस आजपासून पुन्हा एकदा सक्रीय होण्याची शक्यता आहे.
Monsoon Update
Monsoon UpdateSaam tv
Published On

Maharashtra Rain Update: मान्सूनच्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे रडखडलेल्या मान्सूनला पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे. राज्यात मान्सूनच्या आगमनानंतर दडी मारुन बसलेला पाऊस आजपासून पुन्हा एकदा सक्रीय होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

Monsoon Update
Ahmednagar Crime News : अहमदनगरमध्ये दरोडेखोरांच्या मारहाणीत दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी; परिसरात भीतीचं वातावरण

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजपासून महाराष्ट्रात (Maharashtra) जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. 26 जूनपर्यंत पावसाचा (Rain) जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात घट होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. आज आणि उद्या कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात काल देखील अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली.

नागपुरात पावसाची जोरदार हजेरी

नागपुरात (Nagpur) कालपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे खरीप पेरणीला वेग येणार आहे. त्यासोबतच पावसामुळे तापमानात घट झाल्याने नागपूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. नागपुरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

माहुर तालुक्यात पावसाचे आगमन

नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात पावसाचे आगमन झालं आहे. या वर्षातील पावसाळ्यातील हा पहिलाच पाऊस आहे. मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर शेतकऱ्यांना पावसाची मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा होती ती आज आलेल्या पावसाने संपली आहे. माहूर तालुक्यात कुठे मध्यम तर कुठे जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसला आहे. त्यामुळे उकाड्यापासून माहूर तालुक्याला काहीसा दिलासा मिळाला आहे.

वर्धा जिल्ह्यात पावसाचे आगमन

वर्धा जिल्ह्यात सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्याला पावसाच्या आगमनाने दिलासा मिळाला आहे. मागील एका आठवड्यापासून जिल्ह्यातील नागरिक उकाड्याने त्रस्त झाले होते. पावसाच्या आगमनाने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला असून पेरणीच्या कामांना वेग येणार आहे.

Monsoon Update
Beed Accident News: मित्राच्या लग्नाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

रायगडमधील पावसाळी पर्यटन स्थळांवर मनाई आदेश जारी

रायगडच्या माणगावमधील पावसाळी पर्यटन स्थळांवर प्रशासनाने मनाई आदेश जारी करीत बंदी घातली आहे. पावसाळा सुरु झाला कि रायगडच्या दरी खोर्‍यात कोसळणारे धबधबे आणि दुथडी भरून वाहणारे नदी नाले पर्यटकांना आकर्षित करतात. रायगडमधील या पावसाळी पर्यटनाची मौज लुटण्यासाठी मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातुन मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.

मात्र पर्यटकांच्या उत्साहाचा अतिरेक, पावसाचे अति प्रमाण यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण होते आणि दुर्घटना घडतात. या टाळण्यासाठी पावसाळी पर्यटन स्थळ असलेल्या देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट, धरण आणि ताम्हिणी घाटात पावसाळी पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे. माणगाव प्रांताधिकारी उमेश बरारी यांच्या आदेशाने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com