Beed Accident News: मित्राच्या लग्नाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असणाऱ्या पेंडगाव जवळील दुर्दैवी घटना
Beed Accident News
Beed Accident NewsSaam Tv
Published On

Beed Accdient News Today: मित्राच्या लग्नाला जात असताना एका भरधाव वेगातील कारचा भीषण अपघात झाला आहे. कार भरधाव वेगात असतांना चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने कारने 3- 4 पलट्या खाल्ल्या आहेत. (Latest Marathi News)

या भीषण अपघातात कारमधील 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा भीषण अपघात बीड- संभाजीनगर महामार्गावरील पेंडगावजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झाला आहे. यातील जखमीवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Beed Accident News
Ulhasnagar Crime News: जुन्या भांडणाच्या रागातून हत्येचा प्रयत्न; उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरातील घटना

धीरज गुणदेजा वय 30, रोहन वाल्हेकर वय 32, विवेक कांगुने वय 33 अशी मयतांची नावे आहेत. तर आनंद वाघ वय 28 हा गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत. हे सर्व अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील रहिवासी आहेत. (Accident News)

प्राथमिक माहितीवरून, हे चौघे जण आपल्या एका मित्राच्या लग्नाला (Marriage) बीडकडे येत होते. यावेळी अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कारने रस्त्यावर तीन ते चार पलट्या घेऊन रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली. यामधे कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे..

Beed Accident News
Maharashtra Talathi Bharti 2023: खुशखबर! तलाठी गट 'क' संवर्गातील पदांसाठी मोठी भरती; कधी होणार परीक्षा?

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, बीड (Beed) ग्रामीण पोलीस तसेच महामार्ग पेट्रोलिंग टीम यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, या घटनेने बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com