Devendra Fadnavis and Eknath Shinde  Saam Tv
मुंबई/पुणे

BMC Election Result: मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर होणार, महायुतीची बहुमताकडे वाटचाल, कोणकोणत्या पक्षांचे उमेदवार आघाडीवर?

Devendra Fadnavis and Eknath Shinde: मुंबई महानगर पालिका निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळताना पाहायला मिळत आहे. महायुती १२६ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे मुंबईत भाजपचा महापौर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Priya More

Summary -

  • मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर होण्याची शक्यता

  • महायुती १२७ जागांवर आघाडीवर

  • भाजप ९६ जागांसह सर्वात मोठा पक्ष

  • ठाकरे बंधूंची युती दुसऱ्या क्रमांकावर

मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या हाती येत आहे. मुंबईमध्ये महायुतीची सत्ता स्थापन करण्याकडे वाटचाल सुरू आहे. महायुती १२६ जागांवर आघाडीवर आहे. अनेक ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी ठाकरे बंधूंच्या उमेदवारांचा पराभव केला आहे. मुंबईत महायुतीचा बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. महायुतीत सर्वात जास्त जागा भाजपला मिळणार असल्याचे चित्र दिसून येत असल्यामुळे मुंबईचा महापौर भाजपचाच होईल असे म्हटले जात आहे.

मुंबई महानगर पालिका निवडणूक निकालाचा आतापर्यंतचा जो कल हाती आला आहे त्यानुसार, मुंबईतील २२७ जागांपैकी १२७ जागांवर महायुती आघाडीवर आहे. महायुतीमधील भाजप सर्वाधिक ९६ जागांवर आघाडीवर तर शिंदेसेने ३१ जागांवर आघाडीवर आहे. तर ठाकरे बंधूंच्या युतीने देखील मुंबईत चांगली बाजी मारल्याचे दिसत आहे. ठाकरे बंधू ७१ जागांवर आघाडीवर आहेत. यामध्ये ठाकरेंची शिवसेना ६२ जागांवर तर मनसे ९ जागांवर आघाडीवर आहे. स्वबळावर निवडणूक लढवलेला काँग्रेस पक्षाचे उमेदवार १३ आणि राष्ट्रवादी २ जागांवर आघाडीवर आहेत. तर इतरांनी ८ जागांवर आघाडीवर आहे.

मुंबई महानगर पालिका निवडणूक निकालामध्ये सर्वात पहिला उमेदवार काँग्रेसचा विजयी झाला. धारावीतील काँग्रेस उमेदवार आशा काळे यांनी पहिलं खातं खोललं. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेल्या तेजस्वी घोसाळकर, नवनाथ बन यांचा विजय झाला. तर मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि मनसेचे देखील अनेक उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारांची यादी आता समोर येऊ लागली आहे. तर मुंबईत एमआयएमचे ४ उमेदवार विजयी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईकरांची घराणेशाहीला चपराक; आमदार, खासदारांच्या मुलांचा दारुण पराभव|VIDEO

BMC Result: मुंबईत भाजपचीच लाट, शिंदेंचीही बाजी; महायुतीच्या आतापर्यंत विजयी झालेल्या उमेदवारांची यादी

Maharashtra Elections Result Live Update: आमदार तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत पराभूत

Homemade Hair Oil: लांब घनदाट आणि शाईनी केस पाहिजेत? मग आजीने सांगितलेलं हे तेल आठवड्यातून दोन वेळा नक्की लावा

Municipal Election Result: भिंवडी महापालिकेत कोणाचं वर्चस्व? वाचा विजयी उमेदवारांची यादी

SCROLL FOR NEXT