राज्यातील पहिल्या महापालिका निवडणुकीचा निकाल लागला; काँग्रेस-वंचितने विजयाचा गुलाल उधळला

latur municipal Corporation news : राज्यातील पहिल्या महापालिका निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. लातूर महानगरपालिकेवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीने विजयाचा झेंडा रोवला आहे.
latur politics
latur newsSaam tv
Published On

संदिप भोसले, साम टीव्ही

राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे निकालाचे कल हाती येऊ लागले आहेत. राज्यातील बहुतेक महापालिकांच्या मतमोजणीत भाजप आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, लातूर महानगरपालिका अपवाद ठरली आहे. लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने कमाल केली आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने मॅजिक फिगर गाठली आहे.

latur politics
ऐन मतदानाच्या दिवशी मोठा राडा; वादानंतर गोळीबार; जळगावमध्ये नागरिक भयभीत

लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने युती केली होती. या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपने जोरदार प्रचार केला होता. लातूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण देखील मैदानात उतरले होते. या निवडणुकीच्या प्रचारात रवींद्र चव्हाण यांनी लातूरमधून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसण्याची भाषा केली होती.

रवींद्र चव्हाण यांच्या विलास देशमुख यांच्यावरील वक्तव्यानंतर वातावरण फिरलं. रवींद्र चव्हाण यांना भाजपला महागात पडलं. लातूरमध्ये भाजप सपशेल बॅकफूटवर गेल्याचं दिसत आहे. लातूरमध्ये काँग्रेसचे एकूण ४० जागा जिंकल्या आहेत. तर वंचित बहुजन आघाडीने ४ जागा जिंकल्या आहेत.

latur politics
Friday Horoscope : मंदिरात जाऊन अन्नपदार्थ दान करावेत; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तरी घडणार

लातूरमध्ये काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीने एक हाती सत्ता मिळवली आहे. काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजपला केवळ २० जागा जिंकता आल्या आहेत. त्यामुळे भाजपला महापालिकेवर झेंडा फडकवण्याचे स्वप्न धुळीस मिळालं आहे. पालिकेच्या निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते विजयाचा जल्लोष करत आहेत. एकमेकांवर विजयाचा गुलाल उधळत एकमेकांचं अभिनंदन करत आहेत. या विजयाने लातूर महापालिकेवर पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com