Horoscope
Horoscope in Marathi Saam tv

Friday Horoscope : मंदिरात जाऊन अन्नपदार्थ दान करावेत; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तरी घडणार

Friday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांना मंदिरात जाऊन अन्नपदार्थ दान करावे लागतील. काहींच्या आयुष्यात मोठं काही तरी घडणार आहे.
Published on

श्री वासुदेव सत्रे

ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक

मोबाईल नंबर - 9860187085

राशीभविष्य, दिनांक १६ जानेवारी २०२६

Horoscope
Diwali Lighting Vastu Tips: दिवाळीत लायटिंग लावताय? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा निवडा

मेष - तुमची दैनंदिनी तशीच राहण्याची शक्यता आहे. काही प्रमाणात आरोग्याच्या समस्या जाणवतील. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल .

वृषभ -प्रत्येक जणाकडून सुखाची आशा ठेऊ नये. अल्प समाधान ठेवा. जास्त धडपड केल्याने यश मिळणार नाही. बौद्धिक कामात यश मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन - नाविन्यपूर्ण कल्पना उद्योगात आणता येईल. तुमच्या उद्योगाबात बोलताना नतद्रष्टता नसावी. तुमचा उद्योग कोणालाही न सांगता सुरू ठेवा.

कर्क - व्यावसायिकांसाठी आजचा दिवस उत्तम ठरणार आहे. संधीचं सोनं करण्याची संधी आहे. आगाऊ पैसे देणं टाळावे लागेल.

सिंह - पार्टनरसोबत वाद टाळावे लागतील. घराबाहेर जास्त वेळ घालवल्यास फायदेशीर ठरेल. जुने मित्र भेटतील.

कन्या - तुम्ही समाज कार्यात वेळ घालवाल. तुम्हाला स्वभावात तारतम्य बाळगावे लागणार आहे.

Horoscope
Vastu Tips Of Broom: झाडूविषयी हे नियम तुम्हाला माहित आहे का?

तूला - प्रेमात यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला मिळालेले यश टिकून राहील. अनेक वर्षांनंतर नवविवाहित असल्यासारखे वाटेल.

वृश्चिक -तुम्हाला घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशिर्वाद मिळतील. घराच्या बाहेर पडताना गोड पदार्थ खाऊन निघा

धनू - दिवसभरात पैसे जपून खर्च करावे लागतील. जवळच्या मंदिरात जाऊन अन्नपदार्थ दान करावेत. अचानक शुभवार्ता मिळेल.

Horoscope
Vastu Tips : कोणत्या दिवशी आर्थिक व्यवहार करणे टाळावे? जाणून घ्या

मकर - पैसे जपून खर्च करावा लागणार आहे. आकर्षक कपडे परिधान करणे टाळावे.

कुंभ - तुमच्या लहान मुलाला दृष्ट लागल्यास आईच्या पदराने काढायला सांगा. साडेसाती चालू असताना तुमची चैन आहे.

मीन - आपल्या साडेसातीत ज्ञाताज्ञात केलेल्या पापांचा हिशोब होण्याची शक्यता आहे. तरीही निश्चिंत राहा छान दिवस जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com