Mumbai municipal election live updates : मुंबईमध्ये ठाकरे आणि भाजप यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. २२७ जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. मतदानाला सुरूवात होताच मुंबईत पहिला दुबार मतदान सापडला. वॉर्ड क्रमांक १९२ मध्ये सकाळी दुबार मतदार सापडल्याची माहिती समोर आली आहे. मनसेचे उमेदनार यशवंत किल्लेदार मतदानालासाठी मतदान केंद्रावर पोहचले होते, त्याचवेळी दुबार मतदार सापडला. निवडणूक अधिकाऱ्यांकडून दुबार मतदाराला थांबवण्यात आले असून कागदपत्रे तपासण्यात येत आहे. (MNS candidate Yashwant Killedar news)
मुंबईमधील वार्ड क्रमांक १९२ मध्ये सकाळी दुबार मतदार आढळल्याचे समोर आले. येथील मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी सकाळी मतदानाचा अधिकार बजावला. किल्लेदार मतदानासाठी आले होते, त्यावेळी मतदान केंद्रावर दुबार मतदार आढळून आला. या दुबार यादीत असलेल्या महिला मतदाराला थांबवण्यात आले. आधार कार्ड पाहून त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येणार आहे. त्यानंतरच त्यांना मतदान करून दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दुबार मतदारावर यशवंत किल्लेकर यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, ही सर्व निवडणूक आयोगाची चूक आहे.
दुबार मतदार होऊ नये म्हणून भगवा गार्ड म्हणून मुंबई, ठाण्यात ठाकरे बंधू यांचे पदाधिकारी तैनात झालेले आहेत. दुबार मतदार झालं किंवा बोगस मतदान करताना आढळला तर त्यांना जागेवरच फटके देण्यात येतील असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्या पदाधिकार्यांकडून सांगण्यात आले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रचारावेळी दुबार मतदार अथवा बोगस मतदान करणाऱ्यांना ठोकून काढा असा आदेश कार्यकर्त्यांना दिला.
मुंबईतील प्रभाग २२६ मधील मतदान प्रक्रियेत गंभीर गैरप्रकारांचा आरोप करण्यात आला आहे. अपक्ष उमेदवार तेजल दीपक पवार यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दिली आहे. मतदारांना फोन व प्रत्यक्ष भेटीद्वारे धमकावल्याचे तक्रार अर्जात आरोप करण्यात आले आहेत. मतदानाच्या दिवशी वाहनांचा वापर करून दबाव टाकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही अज्ञात व्यक्ती परिसरात फिरत असल्याचेही तक्रारीत म्हटलेय. मतदारांच्या स्वातंत्र्यपूर्ण मतदानाच्या हक्कावर गदा असल्याचा पवार यांनी दावा केला आहे. संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्ताची मागणी त्यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.