BJP Big Plan to Win Bmc Election Saam Tv
मुंबई/पुणे

Bmc Election: मुंबईच्या कट्ट्यांवर रंगणार Pm मोदींची काम की बात! पालिका निवडणुकीसाठी भाजपने आखला मोठा प्लान

मुंबईच्या कट्ट्यांवर रंगणार Pm मोदींची काम की बात! पालिका निवडणुकीसाठी भाजपने आखला मोठा प्लान

साम टिव्ही ब्युरो

BJP Big Plan to Win Bmc Election: गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली मुंबई (Mumbai) महानगपालिकेची निवडणूक कधी जाहीर होणार, असा प्रश्न राजकीय पक्षांसोबतच सामान्यांनाही पडला आहे. असं सगळं असताना भाजपने मात्र पालिका निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. '

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप (BJP) मुंबईतील कट्ट्या-कट्ट्यावर मोदींच्या (Pm Modi) कामांविषयी गप्पा सत्र आयोजित करणार आहे. लोकसभा आणि मुंबई मनपा (BMC) जिंकण्यासाठी भाजपचा नवा फंडा असल्याचं बोललं जात आहे.

कट्ट्यावरील या गप्पांमध्ये केंद्र शासनाची कामे विविध क्षेत्र आणि समजतील लोकांपर्यंत पोहोचण्याचा भाजप प्रयत्न करणार आहे. भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे जनमानसात मोदींच्या विकास कामांबद्दल चर्चा घडवणार आहे. प्रत्येक प्रकोष्ट व मोर्चावर कार्यक्रम घेण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे.  (Latest Marathi News)

मुंबईत भाजपशी संलग्नित ४८ प्रकोष्ट व मोर्चांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना याबाबत आदेश देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपने केंद्र व राज्य शासनाची चांगली कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याची कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवली आहे.

तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे मुंबई दौऱ्यावर आले होते. या दोन्ही नेत्यांनी मुंबईतील भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना संबोधित करताना पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयार राहण्याचं आणि तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यातच आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या (BMC Election 2023) पार्श्वभूमीवर जे. पी नड्डा यांनी अनेक बैठकाही घेतल्या होत्या. जे पी नड्डा यांनी सुस्त पडलेल्या माजी नगरसेवकानाही कामाला लागण्याचे आदेश दिले होते. तसेच भाजपच्या सर्व माजी नगरसेवकांना पुन्हा एकदा प्रभागांमध्ये सक्रिय होण्यास त्यांनी सांगितले होते. महानगरपालिकेतील घोटाळ्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून ठाकरे गटाची पोलखोल करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT