Opposition Party Meeting: 'आम्ही नवाब शरीफ यांचा केक कापायला गेलो नाही'; संजय राऊतांचं फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर

Sanjay Raut News: देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Sanjay Raut News
Sanjay Raut News Saam tv
Published On

Sanjay raut News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १७ विरोधी पक्षातील नेत्यांची महत्वाची बैठक पाटण्यात पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातून शरद पवार आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी हजेरी दर्शवली होती. विरोधी पक्षाच्या बैठकीवरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

मुंबईत संजय राऊत यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. 'कश्मीर हा हिंदुस्थानचा भाग आहे. काश्मीरच्या मेहबुबा मुक्ती यांच्याबरोबर आपण अडीच वर्ष सरकार बनवलं आहे. त्या सरकारमध्ये आपण होतात, त्यांच्या शपथविधीला प्रधानमंत्री स्वतः उपस्थित होते. तेव्हा सडकून टीका करताना जपून टीका करत जावा, असा हल्लाबोल राऊत यांनी फडणवीसांवर केला.

Sanjay Raut News
Mahrashtra Politics: राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार! अजित पवारांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडणार? विरोधी पक्षनेतेपदासाठी मुंडेंच्या नावाची चर्चा

'आम्ही नवाब शरीफ यांचा केक कापायला गेलो नाही किंवा त्यांच्या सरकारमध्ये सामील झालो नाही. भविष्यात त्याच्यावर आम्ही चर्चा करू किंवा आज उद्धव ठाकरे त्याच्यावर बोलतील. कदाचित उगाचच तोंडाच्या वाफा दवडू नका. तुमचंच भूत आहे आणि तुमचंच पाप आहे. कालच्या बैठकीचं फलित एवढेचं आहे की, आम्ही एकत्रित आहोत, एकत्र निवडणूक लढू. 2024 साली आम्ही परिवर्तन घडवून अशा प्रकारचा निर्धार काल बैठकीत झाला आहे आणि तो कायम राहील, असे राऊत पुढे म्हणाले.

मणिपूरच्या हिंसाचारावर भाष्य करताना राऊत म्हणाले, ' मणिपूर ज्या प्रकारे पेटले. या भागात शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे. पोलिसांवरही हल्ले झाले आहेत, तिथे आमदारांची घरे जाळली गेली आहेत. मणिपूर हे गृहमंत्री केंद्र सरकारच्या नियंत्रणात राहिलेलं नाही. अमित शाह हे गृहमंत्री, पोलादी पुरुष असताना देखील ते मणिपूरचा हिंसाचार थांबवू शकले नाही, अशी टीका राऊत यांनी केली.

Sanjay Raut News
Maharashtra Politics: पंकजा मुंडेंना मोठी राजकीय संधी; 'या' पक्षाकडून थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर, चर्चेला उधाण

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

विरोधी पक्षाच्या बैठकीवर टीका करताना फडणवीस म्हणाले होते की,'विरोधी पक्षातील नेत्यांची मोदी हटाव बैठक नाही. ही बैठक म्हणजे विरोधी पक्षांची बैठक ही कुटुंब बचाव बैठक आहे. अशा प्रकारचे किती बैठका घेतल्या, तरी केंद्रात नरेंद्र मोदी हेच येणार आहे'.

'आता उद्धव ठाकरे हे मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत बैठकीत बसणार आहेत. जे आधी त्यांच्यावर टीका करत होते. आता ते काय बोलणार? कोव्हिड काळात ज्यांनी भ्रष्टाचार केला, ज्यांनी मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाल्ले आहे, त्यांची चौकशी होणारच. त्यांना सोडता येणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com