Maharashtra Politics: पंकजा मुंडेंना मोठी राजकीय संधी; 'या' पक्षाकडून थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर, चर्चेला उधाण

Political News: 'देवेंद्र फडणवीस टीमकडून पंकजा मुंडेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न'
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

Beed Political News: महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीची तयारी आता सर्वच पक्षाकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणात आता तेलंगणाच्या बीआरएस पक्षाने पाय रोवने सुरू केले आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्याकडून रोज नव्या नव्या चेहऱ्यांना बीआरएस पक्षात प्रवेश दिला जात आहे. अनेक नाराज मंडळी हे बीआरएस पक्षात जात असल्याचे चित्र महाराष्ट्रभर पाहायला मिळत आहे. तर आता याच बीआरएस पक्षाकडून भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा असणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना थेट ऑफर देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Politics
Beed News : बीडमधील नागरिकांना मिळतोय शौचालयातील भाजीपाला? प्रकरण काय

जर पंकजा मुंडे (Pankaja Munde) बीआरएस पक्षात आल्या तर आम्ही त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री करू. त्याचबरोबर बीड पासून हैद्राबादपर्यंत रेड कार्पेट अंथरून आम्ही पंकजा मुंडे यांचे स्वागत करू अशी थेट ऑफर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना बीआरएस पक्षाचे महाराष्ट्राचे समन्वयक शिवराज बांगर यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे मुंडेंचा आवाज भाजपकडून दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या टीमकडून हा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप देखील यावेळी बीआरएस पक्षाचे समन्वयक शिवराज बांगर यांनी केला आहे.

विशेष म्हणजे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचं मोलाचं कार्य भाजपसाठी आहे. मात्र आज त्यांच्याच मुलींना या ठिकाणी डावलण्यात येत आहे. त्यांचा आवाज दाबला जात आहे. आज महाराष्ट्राचा नेतृत्व या पंकजा मुंडे आहेत.

Maharashtra Politics
Mumbai Crime News: बनावट नोटा वटवण्यासाठी आलेल्या आरोपीस अटक, मालवणी पोलिसांची कारवाई

45 ते 50 विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे या सांगेल तोच आमदार होतो. मात्र हे सगळं असताना या नेतृत्वाला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आम्ही पंकजा मुंडे यांना खुला आव्हान देतोय, त्यांनी आमच्या पक्षात यावं, त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री करू असं देखील शिवराज बांगर म्हणाले.

दरम्यान, येणाऱ्या 27 तारखेला आषाढी एकादशीनिमित्त तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआरसह विठुरायाच्या चरणी नतमस्तक होणार आहे. त्याचीच तयारी बीआरएस पक्षाच्या समन्वयाकडून राज्यभर सुरू आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात बीआरएस पक्षाकडून नवा डाव आखला जात आहे. पंकजा मुंडेंना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली जात आहे. रेड कार्पेट अंथरूण स्वागत करू असा देखील सांगितला जात आहे. त्यामुळे आता भाजप नेत्या पंकजा मुंडे बीआरएस पक्षाची ऑफर स्वीकारणार का? आणि यावर त्या काय बोलणार ? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com