Mahrashtra Politics: राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार! अजित पवारांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडणार? विरोधी पक्षनेतेपदासाठी मुंडेंच्या नावाची चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा भाकरी फिरणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Mahrashtra Politics
Mahrashtra PoliticsSaam tv
Published On

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा भाकरी फिरणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यपदावर अजित पवार तर विरोधी पक्षनेतेपदासाठी धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा आहे. लवकरच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. ( Latest Marathi News)

राजकीय गणिते पदाची अपेक्षा व्यक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचाली सुरू जुळविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून अजित पवार तर विरोधी पक्षनेतेपदासाठी पक्षातील फायर ब्रँड नेते धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा आहे. दिल्लीत २८ जून रोजी होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

Mahrashtra Politics
Uday Samant On Uddhav Thackeray: आपल्या वारसदारांचे भविष्य सुरक्षित करणे यालाच महाविकास आघाडीचे प्राधान्य, उदय सामंत यांचं टीकास्त्र

अजित पवार हे वजनदार नेते असल्यामुळे त्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांची पक्षाने दखल आठवडाभरापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगाने घडामोडी घडत आहेत. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यानंतर लोकसभेची निवडणूक होईल.

लोकसभेबरोबरच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या नाराजीचा पक्षाला फटका बसू नये यासाठी विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर इतर जबाबदारी सोपवली जाणार असल्याचे समजते. राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीत होईल. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासोबतच पक्षातील संघटनात्मक बदलाबाबत पवार निर्णय घेतील, अशी चर्चा आहे.

Mahrashtra Politics
Nitin Gadkari News: 'सत्य मांडण्याची पत्रकारांना किंमत मोजावी लागते..' केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत

छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद ओबीसी समाजाला द्यावे, अशी सूचना केली होती. परंतु लोकसभेसोबतच विधानसभेचीही निवडणूक होण्याच्या चर्चेमुळे अजित पवार यांच्यासारख्या आक्रमक नेत्याच्या हाती पक्षाची धुरा सोपवण्यास पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी पसंती दिल्याचे समजते. या बदल्यात धनंजय मुंडे यांच्यावर विधानसभा विरोधी पक्षनेतेपद सोपवले जाणार असल्याचे समजते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com