Uday Samant On Uddhav Thackeray: आपल्या वारसदारांचे भविष्य सुरक्षित करणे यालाच महाविकास आघाडीचे प्राधान्य, उदय सामंत यांचं टीकास्त्र

आपल्या वारसदारांचे भविष्य सुरक्षित करणे यालाच महाविकास आघाडीचे प्राधान्य, उदय सामंत यांचं टीकास्त्र
Uday Samant on Uddhav Thackeray
Uday Samant on Uddhav ThackeraySaam Tv
Published On

Uday Samant On Uddhav Thackeray: बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर घेतलेल्या भूमिकेला विसंगत भूमिका ठाकरे गट घेत आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या भूमिकेसोबत प्रतारणा करत असून बाळासाहेबांनी पाया घातलेल्या भूमिकेशी तडजोड करुन केवळ सत्ता आणि वारसदारांचे राजकीय भविष्य सुरक्षित करण्याला महत्त्व देत असल्याची टीका शिवसेनेचे नेते व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली.

३७० कलम हटवणे हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. आपल्याला एक दिवस पंतप्रधान केले तर ३७० कलम हटवू असा त्यांनी सांगितले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचे हे स्वप्न साकार केले. मात्र उध्दव ठाकरे ३७० कलम हटवण्याची मागणी करणा-यांच्या बाजूला जावून बसले, हे राज्याचे व देशाचे दुर्देव आहे, त्याचे उत्तर ठाकरे यांना राज्याला द्यावेच लागेल, उद्धव ठाकरेंनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी उदय सामंत यांनी केली.

Uday Samant on Uddhav Thackeray
Mumbai News: स्विमिंग कोचचं झालं दुर्लक्ष, अन् घडली जीवघेणी दुर्घटना

राज्यातील महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतात, विरोधी पक्षनेते अजित पवार मोदींचे कौतुक करतात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहणार की जाणार हे त्यांनाच माहित नाही, अशा परिस्थितीत आपले कार्यकर्ते सैरभैर होऊ नयेत, यासाठी राज्यातील नेते पाटण्याला गेले आहे, अशी टीका त्यांनी केली. (Latest Marathi News)

पाटण्यात झालेल्या बैठकीला कोणताही किमान समान कार्यक्रम नव्हता. आपापल्या मुला मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्व नेते एकत्र आले होते. या बैठकीला सर्व कौटुंबिक राजकीय पक्ष सामिल झाले होते. आजची बैठक एकमेकांची उणीदुणी काढणारी होती. एका व्यक्तीला हटवण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागले, हाच नरेंद्र मोदींचा मोठेपणा आहे. विरोधकांकडे समान कार्यक्रम व कोणतीही भूमिका नसल्याने विरोधकांनी कितीही आदळाआपट केली तरी पुढील पंतप्रधान नरेंद्र मोदीच होतील, असाही सामंत म्हणाले आहेत.

Uday Samant on Uddhav Thackeray
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर आज रात्रीचा मेगाब्लॉक, या ट्रेनच्या वेळापत्रकात बदल

राज्यातील नेते पाटण्याला गेले खरे, मात्र राज्यातली वज्रमुठ कायम राहिल की नाही हे लवकरच कळेल, असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला. पाटण्याच्या बैठकीत समन्वयक नेमण्याऐवजी देशाचे नेतृत्व करु शकेल अशा नेत्याला पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करावे, असा टोला त्यांनी लगावला. स्वतःच्या अस्तित्वाची धडपड करणारे नेते एकत्र आल्याने काहीच साध्य होणार नाही, असे ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com