Mumbai News: स्विमिंग कोचचं झालं दुर्लक्ष, अन् घडली जीवघेणी दुर्घटना

स्विमिंग कोचचं झालं दुर्लक्ष, अन् घडली जीवघेणी दुर्घटना
 Mumbai News 14-year-old student dies after drowning in swimming pool
Mumbai News 14-year-old student dies after drowning in swimming poolSaam Tv
Published On

>> संजय गडदे

Mumbai Latest News: मुंबईच्या दिंडोशी गोकुळधाम भागातील यशोधाम विद्यालयाच्या जलतरण तलावात बुडून चौदा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. शार्दुल संजय आरोलकर (वय १४ वर्षे) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे.

आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास स्विमिंग कोचच्या उपस्थितीत हा मुलगा जलतरन तलावात उतरला असता पोहताना ही दुर्घटना घडली.मात्र स्विमिंग कोचच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप त्या मृत विद्यार्थ्याच्या पालकांनी केला असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी मृत विद्यार्थ्याच्या पालकांनी केली आहे

 Mumbai News 14-year-old student dies after drowning in swimming pool
Satara News: सोशल मीडियावर स्वत:ला श्रद्धांजली वाहून तरुणानं उचललं टोकाचं पाऊल;परिसरात खळबळ

याबाबत अधिक माहिती अशी की, शार्दुल हा बोरिवली पश्चिमेकडील योगी नगर भागातील शासकीय वसाहतीत राहायला आहे. तो यशोधाम विद्यालयात नववीमध्ये शिक्षण घेत होता. शिक्षणासोबतच शाळेच्या आवारात असलेल्या जलतरण तलावात पोहण्याचे प्रशिक्षण घेत होता. त्यासाठी चार स्विमिंग कोच देखील नेमण्यात आले होते.

आज सकाळी शाळेत गेल्यानंतर स्विमिंग कोच सागर हे त्याला स्विमिंग शिकवण्यासाठी घेऊन गेले. मात्र दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शार्दुल जलतरण तलावात बुडाला. त्याला बाहेर काढण्यात आल्यानंतर त्याने उलटी केली. म्हणून त्याला लाईफ लाईन या खाजगी रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी दाखल केले.

 Mumbai News 14-year-old student dies after drowning in swimming pool
Wardha Accident News : वेगवान कार झाडावर आदळली; जीवलग मित्रांनी गमावला जीव

मात्र लाईफ लाईन रुग्णालयाच्या डॉक्टरांनी शार्दुल याला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी घेण्यास सांगितले त्यानंतर त्याला कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

मात्र या दुर्घटनेस शाळा व्यवस्थापन आणि स्विमिंग कोच हेच जबाबदार असल्याचा आरोप मृत विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला असून त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील पालकांनी केली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com