Pm Modi America Visit: अमेरिका दौऱ्याच्या शेवटी पंतप्रधान मोदींनी शेअर केला एक खास व्हिडीओ, पाहा...

अमेरिका दौऱ्याच्या शेवटी पंतप्रधान मोदींनी शेअर केला एक खास व्हिडीओ, पाहा...
Pm Modi America Visit Viral Video
Pm Modi America Visit Viral Video Saam Tv
Published On

Pm Modi America Visit Viral Video: अमेरिकेचा स्टेट दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तला रवाना झाले आहेत. पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा अनेक अर्थांनी ऐतिहासिक होता. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या दौऱ्याच्या शेवटी एक खास ट्विटही केलं आहे. मोदींनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यातील खास क्षणांचा व्हिडीओ शेअर केला आहे.

हा व्हिडीओ (Viral Video) शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''अमेरिकेच्या एका खास भेटीचा शेवट, जिथे मला भारत-अमेरिका मैत्रीला गती देण्याच्या उद्देशाने अनेक कार्यक्रम आणि संवादांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. आपला देश पुढील पिढ्यांसाठी एक चांगलं स्थान बनवण्यासाठी आम्ही एकत्र काम करत राहू.''

Pm Modi America Visit Viral Video
Opposition Party Meeting: 'आम्ही नवाब शरीफ यांचा केक कापायला गेलो नाही'; संजय राऊतांचं फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या स्टेट दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी चर्चा केली आणि अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. आता पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसीच्या निमंत्रणावरून दोन दिवसांच्या इजिप्तच्या राज्य दौऱ्यावर आहेत. (Latest Marathi News)

साल 1997 नंतर भारतीय पंतप्रधानांची इजिप्तची (Pm Modi Egypt Visit) ही पहिली अधिकृत भेट असेल. राष्ट्राध्यक्ष बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी अमेरिकेला आले होते. त्यांचा अमेरिका दौरा न्यूयॉर्कमध्ये सुरू झाला, जिथे 21 जून रोजी नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात एक ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Pm Modi America Visit Viral Video
Kolhapur News: तरूण उद्योजकानं पत्नी आणि मुलासह संपवलं जीवन; बेडरूममध्ये आढळले तिघांचे मृतदेह

यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी वॉशिंग्टन डीसीमधील व्हाईट हाऊसमध्ये 'रेड-कार्पेट'वर त्यांचे भव्य स्वागत केले. पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ बायडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये स्टेट डिनरचे आयोजन केले होते.

या भेटीदरम्यान, संरक्षण, अंतराळ आणि व्यापार यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात भारत आणि अमेरिका यांच्यातील सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रमुख करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी लष्करी विमानांसाठी जेट इंजिनच्या संयुक्त उत्पादनावर ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com