BMC Commissioner Iqbal Singh Chahal  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News : धोकादायक इमारतींचा विजपुरवठा खंडीत करा, बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या सूचना

BMC News: मुंबईतील सी-१ श्रेणीतील धोकादायक इमारती रिकाम्या करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिला आहेत.

सुरज सावंत

BMC Commissioner Iqbal Singh Chahal Instructions: मुंबईतील सी-१ श्रेणीतील धोकादायक इमारती रिकाम्या करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिला आहेत. तसेच या इमारतींमधील रहिवाशांना इमारत रिकामी करण्याच्या नोटीस बजावण्याच्या आणि त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये धोकादायक इमारतींचा पाणी पुरवठा खंडित करण्याच्याही सूचनाही चहल यांनी संबंधितांना दिल्या आहेत. येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध यंत्रणांमध्ये सुयोग्य समन्वय साधला जाण्याच्या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले आहेत.

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुंबई वाहतूक पोलीस सह आयुक्त प्रवीण पडवळ, प्रभारी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) रमेश पवार, सामान्य प्रशासन विभागाचे सह आयुक्त मिलिन सावंत, महानगरपालिका आयुक्त कार्यालयाचे सह आयुक्त चंद्रशेखर चोरे, हे उपस्थित होते. यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी संगणकीय सादरीकरण केले. (Latest Political News)

मुंबईत पूर्व उपनगरांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका आहे. याठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याचे काम विविध यंत्रणांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी पातळीवर योग्य समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही महानगरपालिका आयुक्त चहल यांनी दिले. खासगी इमारतींच्या ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्यासाठी धोरण निश्चिती करण्याचा विषय शासन पातळीवर प्रस्तावित आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Putin -Jinping Immortal: पुतीन आणि जिनपिंग अमर होणार? चीन-रशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडे कोणती जडीबुटी?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Baaghi 4 Cast Fees : टायगर श्रॉफ ते श्रेयस तळपदे, 'बागी 4'साठी कोणी किती घेतलं मानधन?

Vashi Toll Accident : वाशी टोल नाक्यावर भंयकर अपघात, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: अमरावतीमध्ये भीषण अपघात झाला, टोमॅटोने भरलेला पिकअप उलटला

SCROLL FOR NEXT