Nashik News: प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा हे सूत्र ठरलेलेच आहे. अनेक ठिकाणी कार्यक्रम मध्येच बंद करण्याची वेळही येते. तिच्या नृत्यापेक्षा सध्या या राड्याचीच चर्चा अधिक असते. आज म्हणजेच मंगळवारी नाशिक येथे गौतमीचा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात पुन्हा राडा झाला आहे. गौतमीच्या हुल्लडबाज चाहत्यांनी पत्रकारांना मारहाण केल्याची माहिती आहे. या मारहाणीत दोन पत्रकार जखमी झाले आहेत. (Breaking Marathi News)
गौतमी पाटील हिचा पहिल्यांदाच नाशिकमध्ये कार्यक्रम होत आहे. त्यामुळे गौतमीला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे. अशातच हुल्लडबाज तरुणांनी कार्यक्रमात राडा घालण्यास सुरूवात केली होती. यावेळी काही पत्रकार आणि पोलीस या तरुणांची समजूत काढण्यासाठी गेले. तेव्हा या तरुणांनी थेट पत्रकारांना मारहाण केली. (Latest Marathi News)
या मारहाणीत पत्रकार जखमी झाले असून त्यांना मुका मार देखील लागला आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. दरम्यान, या राड्यानंतर कार्यक्रमात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, पोलिसांनी वेळेवर मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी (Police) थेट स्टेजवर जाऊन गौतमीच्या चाहत्यांना शांत राहण्याचं आव्हान केलं.
नाशिक शहरात पहिल्यांदाच गौतमी पाटील हिच्या डान्सचा कार्यक्रम होत आहे. गौतमीच्या या कार्यक्रमासाठी एकाच वेळी ७०० महिलांनी बुकींग केले आहे. या कार्यक्रमासाठी महिलांना ४० टक्के सवलत देण्यात आली. महिला आणि युवतींच्या प्रचंड मागणीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णवाहिका निधी संकलनासाठी हा कार्यक्रम ठक्कर डोमवर आयोजित करण्यात आला आहे.
गौतमी पाटीलवर बार्शीत गुन्हा दाखल
दरम्यान, गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्याविरोधात बार्शीत गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आलेली. यावरही गौतमीने प्रतिक्रिया दिली. “मी वेळेत पोहोचले होते. आजपर्यंत असं घडलं नाहीय की, लेट गेले आणि उशिराने कार्यक्रम सुरु झालाय. मी वेळेत पोहोचले होते. मला दहा वाजेपर्यंत परवानगी असते. माझ्या कार्यक्रमाला पोलीस असतात. त्यांची साथ असते. त्यामुळे त्यांचं म्हणणं मला ऐकावं लागणार. ते मला म्हटले दहाला कार्यक्रम बंद करा. तर मी दहा वाजता कार्यक्रम बंद करणारच आहे. याबाबत मी सविस्तर माहिती घेऊन आपल्याशी बोलेन”, अशी प्रतिक्रिया गौतमीने दिली.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.