Palghar Crime News: पालघर हादरलं! सख्खा दाजीने केला अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार; काळिमा फासणारी घटना

Palghar Crime News: मेहुण्याने आपल्याच मेहुणीचं लैंगिक शोषण केल्याचं समोर येताच परिसरातील नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
Palghar Crime News
Palghar Crime NewsSaam TV

Palghar Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महिला अत्याचाराविरोधात कठोरात कठोर पाऊलं उचलण्याची मागणी होत आहे. एकीकडे पोलीस आरोपींच्या मुसक्या आवळत असताना दुसरीकडे पालघरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने आपल्याच १७ वर्षीय मेहुणीचं लैंगिक शोषण केलं आहे.  (Breaking Marathi News)

Palghar Crime News
Women Secret: महिला घरात एकट्या असताना काय करतात?

पालघरच्या बोईसरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. याप्रकरणी पीडित तरुणीच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी (Police) आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आज त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. मेहुण्याने आपल्याच मेहुणीचं लैंगिक शोषण केल्याचं समोर येताच परिसरातील नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण लग्नाचं आमिष दाखवून बायकोच्या सख्या लहान बहिणीचं मागील दोन वर्षांपासून लैंगिक शोषण करत होता. तसंच काही दिवसांपूर्वी याच आरोपीने स्वतःच्या चार वर्षीय चिमुकल्या मुली सोबत देखील अश्लील चाळे (Crime News) केले होते. हा प्रकार उघड होताच, पत्नीने पतीविरोधात पोलिसांत धाव घेतली.

Palghar Crime News
Akola Crime News: पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय; तरुणाचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

पत्नीने दिलेल्या फिर्यादीनंतर आरोपी विरोधात पॉक्सोसह विविध कलमान्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या घटनेनंतर बोईसर परिसरात नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात असून आरोपीला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे . मागील आठवडाभरापासून बोईसर पोलीस ठाण्या अंतर्गत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामध्ये बोईसर पोलिसांना गुन्हेगारांवर आळा बसवण्यात अपयश येत असल्याचं वारंवार समोर येत आहे.  (Latest Marathi News)

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com