Ramdas Kadam Vs Raosaheb Danve Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO: भाजपाचा शिंदेंच्या सेनेत हस्तक्षेप? रामदास कदमांनी केले गंभीर आरोप, रावसाहेब दानवेंनी दिलं प्रत्युत्तर

साम टिव्ही ब्युरो

विधानसभेचे शिवसेना शिंदे गटाच्या जागावाटपात भाजपने हस्तक्षेत करू नये. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हस्तक्षेपामुळेच शिंदे गट चार ते पाच जागा हरल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला आहे.

कदमांच्या आरोपानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचं चित्र आहे. रामदास कदम यांचे आरोप भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी फेटाळले आहेत.

शिवसेनेच्या वर्धापनदिनी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांच्या समोरच रामदास कदम म्हणाले की, ''लोकसभा निवडणुकीत आपण गाफील राहू नये.'' त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना विनंती करत म्हटलं की, आपल्या भाजपच्या नेत्यांना सांगा की, जसे भाजपचे उमेदवार दोन महिन्यांआधी दिले, तसे शिवसेने उमेदवार दोन महिन्यांआधी दिले असते, आज चित्र वेगळं दिसलं असतं.

रावसाहेब दानवे काय म्हणाले, ''अशी वेगवगेळी गणितं राजकारणात मांडली जातात. याचा अर्थ असा नाही की, जागा आधी जाहीर झाल्या असत्या तर निवडून आले असते. आमचे छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार ऐनवेळेला जाहीर करण्यात आला आणि ते निवडून आले. अनेक उमेदवार असे आहेत.''

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांच्या या वक्तव्यावरून भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suryakumar Yadav: सूर्या भाऊ रॉक्स! मोठ्या रेकॉर्डमध्ये बटलरला सोडलं मागे; रोहित ऑन टॉप

IND vs BAN 1st T20I: टीम इंडियाची यंगिस्तान जोमात! हार्दिकचा फिनिशिंग टच अन् बांगलादेशवर ७ विकेट्सने विजय

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या ५व्या सीझनची Happy Ending; मात्र 'या' सदस्याचे केले भरभरुन कौतुक..

Bigg Boss Marathi 5 Jahnavi Killekar : बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर जान्हवीची पहिली पोस्ट म्हणाली, "७० दिवसाच्या प्रवासानंतर..."

IND vs BAN: 0,0,0,0,0,0..टीम इंडियाची स्पीड मशीन जोमात; Mayank ने पहिल्याच ओव्हरमध्ये नोंदवला मोठा रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT