Gujarat Election Results 2022 Saam Tv
मुंबई/पुणे

Gujarat Election Results 2022 : "गुजरात तर मोदींचेच होते, पण दिल्ली जिंकणे ही खरी कसोटी होती"

गुजरातमधील ऐतिहासिक विजयाचे श्रेय फक्त श्री. मोदी यांनाच द्यायला हवे. गुजराती मनावर मोदीची मोहिनी आहे व मोदी हीच गुजरातची अस्मिता आहे. असं कौतुक सामनातून करण्यात आलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक कामगिरी करत १८४ पैकी १५८ जागा जिंकल्या. काँग्रेसचा मात्र दारुण पराभव झाला. काँग्रेसला फक्त १६ जागांवर विजय मिळवता आला. दुसरीकडे आपल्या आक्रमक प्रचाराद्वारे मोठी हवा निर्माण केलेल्या ‘आप’ला मात्र तीन ते दोन अंकी आकडा गाठणंही कठीण झालं. दरम्यान, गुजरातमध्ये भाजपने मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून पंतप्रधान मोदींचं कौतुक करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

‘‘आजचा गुजरात मी बनवला आहे, हे गुजरात माझे आहे,’’ असा प्रचार पंतप्रधान मोदी यांनी केला व गुजराती जनतेने त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. मोदी हे गुजरातचे पंधरा वर्षे मुख्यमंत्री होते व या काळात गुजरातने प्रगती केली. पंतप्रधान म्हणूनही मोदी यांनी गुजरातकडे विशेष लक्ष दिले. त्यामुळे गुजरातमधील ऐतिहासिक विजयाचे श्रेय फक्त श्री. मोदी यांनाच द्यायला हवे. गुजराती मनावर मोदीची (PM Narendra Modi)  मोहिनी आहे व मोदी हीच गुजरातची अस्मिता आहे. असं कौतुक सामनातून करण्यात आलं आहे.

'काँग्रेस पक्षाची गुजरातमध्ये वाताहत झाली. काँग्रेस किमान पन्नास जागांपर्यंत पोहोचेल व पराभवातही प्रतिष्ठा ठेवेल अशी अनेकांची भाबडी आशा होती. काँग्रेस 20 जागांचा टप्पाही पार करू शकली नाही. 1985 च्या निवडणुकीत गुजरातमध्ये माधवसिंग सोळंकी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 149 जागा जिंकल्या होत्या. हा विक्रम आतापर्यंत कायम होता. यावेळी ‘149’ चा आकडा पार करू असे भाजपचे प्रमुख नेते सांगत होते. तसा आकडा पार करून भाजपने नवा विक्रम निर्माण केला. भाजपच्या गणित तज्ञांचेही कौतुक करावेच लागेल', असंही सामनातून मांडण्यात आलं आहे.

"दिल्लीत मोदींची जादू का चालू शकली नाही?"

'गुजरातचे निकाल भाजपसाठी जितके ऐतिहासिक तितकेच दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या नाकासमोर झालेला भाजपचा पराभव ऐतिहासिकच म्हणावा लागेल. दिल्ली महानगरपालिकेत भाजपची 15 वर्षे सत्ता होती. ती उलथवून टाकण्यात ‘आप’ला यश आले. दिल्ली ही देशाची राजधानी आहे व पंतप्रधान मोदींचे राजकारणाचे पेंद्रस्थान आहे. येथे मोदींची जादू का चालू शकली नाही? गुजरात तर मोदींचेच होते, पण दिल्ली जिंकणे ही खरी कसोटी होती, असा टोलाही सामनातून लगावण्यात आला.

"भाजपने हिमाचल गमावले त्यावर कोणीच बोलत नाही"

'हिमाचल प्रदेशचे म्हणावे लागेल. हिमाचल प्रदेशात भाजपची सत्ता होती. तेथे आता काँग्रेसने विधानसभेत पूर्ण बहुमत मिळवले आहे. हिमाचलमध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाले, पण त्यांचे आमदार पह्डून सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत भाजप असेल तर ते अनैतिक आहे. अर्थात भाजपच्या राजकारणात सत्ता हेच सत्य असल्याने नैतिक व अनैतिकता वगैरे शब्द निरर्थक आहेत. एपंदरीत गुजरात विजयाने भाजप जल्लोष करीत आहे. ते यश सर्वश्री श्री. मोदी यांचे आहे, पण दिल्ली व हिमाचल प्रदेश भाजपने गमावले त्यावर कोणीच बोलत नाही. असे का?', असा सवालही सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT