PM Modi Speech : देशासमोर आव्हान असताना जनतेचा भाजपवर विश्वास; निकालानंतर मोदींची प्रतिक्रिया

गुजरातच्या जनतेने विक्रम मोडत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
PM Modi
PM ModiSaam TV

PM Modi Speech : गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयातून कार्यकर्त्यांना संबोधित केले.

गुजरातमधील निकालात विक्रमी विजयाबद्दल मोदींना मतदारांचे आभार मानले. तर हिमाचलमध्ये पराभव झाला तरी फरक फार मोठा नसल्याचं मोदींना म्हटलं. तर विकासकामांना आमचं प्राधान्य असेल असं आश्वासनही त्यांनी जनतेला दिलं. तसेच तरुण तेव्हाच मतदान करता जेव्हा त्यांना विश्वास असतो, असंही मोदींनी म्हटलं. (Election 2022

You May Like

PM Modi
UP By-election 2022: डिंपल यादव यांचा मोठ्या फरकाने विक्रमी विजय, भाजप उमेदवार जवळपासही नाही

विकसित भारताची सर्वसामान्यांची इच्छा किती प्रबळ आहे, हे गुजरातच्या निकालांनी स्पष्ट केलं आहे. देशासमोर आव्हान असताना देशातील जनतेचा भाजपवर विश्वास आहे, हा संदेश स्पष्ट आहे, असंही मोदींना म्हटलं.

जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी केलेले कष्ट आज आपल्याला सर्वत्र दिसत आहेत. भाजपला मिळत असलेला वाढता पाठिंबा घराणेशाही आणि भ्रष्टाचाराविरोधात जनतेचा रोष दाखवत आहे.

गुजरातच्या जनतेने विक्रम मोडत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गुजरातच्या स्थापनेपासून आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले गेले आहेत. भाजप हा गुजरातमधील प्रत्येक कुटुंबाचा आणि प्रत्येक घराचा भाग आहे, असंही मोदींनी म्हटलं.

PM Modi
Rahul Gandhi Tweet: गुजरातमधील पराभव, हिमाचलमधलं यश; राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

देशातील तरुण तेव्हाच मतदान करतात जेव्हा त्याला विश्वास असतो. तरुणांनी मोठ्या भाजपला मतदान केलं म्हणजेच त्यांना भाजपवर विश्वास आहे. तरुणांना जातीपातीचं नाही तर विकासाचं राजकारण हवं आहे, असंही मोदी म्हणाले.

भाजपला मिळालेला जाहीर पाठिंबा म्हणजे गरीब, शोषित, वंचित, आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी मिळालेला पाठिंबा आहे. देशाच्या हिताचे सर्वात मोठे आणि कठोर निर्णय घेण्याची ताकद भाजपमध्ये असल्याने लोकांनी भाजपला मतदान केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com