eknath shinde news  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra politics : नालायक वृत्तीला विरोधच, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर भाजपचा पुन्हा हल्लाबोल, नवी मुंबईतला वाद पेटला

Navi Mumbai Local Body Election News : नवी मुंबईत भाजप विरुद्ध शिंदे गटातील शिवसेनेचा वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजपच्या माजी नगरसेवकाकडून बिल्डर लॉबी, नगरविकास विभागावर थेट आरोप. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर भाजपचा हल्लाबोल केलाय.

Namdeo Kumbhar

विकास मिरगणे, नवी मुंबई प्रतिनिधी

BJP vs Shiv Sene Shinde, Navi Mumbai : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबई आणि ठाण्यातील शिवसेना-भाजपाचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नवी मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेवकाकडून एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका कऱण्यात आली आहे. नवी मुंबई विकास, बिल्डर लॉबीचा उल्लेख करत भाजपच्या शिंदेंच्या नेतृत्वावरही सवाल उपस्थित केले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यातील अतंर्गत वाद चव्हाट्यावर आला.(BJP vs Eknath Shinde Sena clash in Navi Mumbai)

नवी मुंबईतील असंख्य प्रकल्पग्रस्त आजवर सिडको, महापालिकेत वर्षानुवर्ष कंत्राटी पद्धतीने काम करीत असताना त्यांचासाठी नगरविकास विभागाने कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र बारवी धरण प्रकल्पग्रस्तांसाठी एका दिवसात निर्णय घेत 54 जणांना कायम नोकरी दिली. येथील जनतेला पाणी आणि मुलभूत सुविधांची वानवा असताना १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत एका दिवसात समावेश केला. बिल्डर लॉबीसाठी शहराच्या FSI क्षेत्रात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेणारे या शहरासाठी नालायक आहेत, त्यांना आम्ही नालायक म्हटले आहे. अशा नालायक वृत्तीला आमचा विरोध आहे, असा घणाघात भाजपच्या नवी मुंबईतील माजी नगरसेवकांनी केला.

नवी मुंबई शहरातल्या पायाभूत सुविधा पळवण्याचा काम कोणी केलं? बिल्डर लॉबीसाठी नवीन शहरातले भूखंड कोणी लुटले? तसेच कोविड काळामध्ये नवी मुंबईचा निधी कोणी पळवला? अशा अनेक प्रकारचे सवाल भाजपच्या माजी नगरसेवकांनी उपस्थित केले. भाजपच्या माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर आणि नगरसेवकांवर जाहीर टीका केली आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना आतापासूनच रंगायला सुरुवात झाली आहे. भाजप नेत्याच्या आरोपावर शिवसेना नेत्याकडून काय उत्तर दिले जातेय, याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागेलय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शेत-तळ्यामध्ये बुडून तीन तरुणांचा मृत्यू, गोंदियातील घटना

SSKTK OTT Release : तुझे लागे ना नजरिया; वरुण-जान्हवीचा रोमँटिक ड्रामा 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

दिवाळीनंतर निवडणुका लागणार? BMCच्या विभागरचनेबाबत सर्वात मोठी बातमी समोर

Bihar Election: निवडणुकीचं बिगुल आज वाजणार, आयोग करणार मोठी घोषणा, १७ मोठे बदल होणार

Gold Price Today: सोन्याने पुन्हा भाव खाल्ला! १० तोळा १३,७०० रुपयांनी महागलं; २२ - २४ कॅरेटचा आजचा भाव किती?

SCROLL FOR NEXT