Hospital Fire: रूग्णालयात मध्यरात्री अग्नितांडव, ICU मधील ६ रूग्णांचा गुदमरून मृत्यू

jaipur sms hospital icu fire 2025 full details : जयपूरमधील एसएमएस रुग्णालयात मध्यरात्री भयानक आग लागली. आयसीयूतील सहा रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला असून मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी ५ लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे.
jaipur sms hospital icu fire 2025 full details
Fire breaks out at Jaipur’s SMS Hospital ICU — six patients charred to death in a midnight tragedy.Saam TV Marathi News
Published On

rajasthan hospital fire tragedy latest update : जयपूरमधील सवाई मान सिंह रूग्णालयात मध्यरात्री भयानक आग लागली. या आगीमध्ये उपचार घेणाऱ्या सहा रूग्णांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मृतामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. मुख्यमंत्री भजनलाल यांनी या घटनेबाबत दुख व्यक्त करत मृताच्या कुटुंबियांना पाच लाखांच्या मदतीची घोषणा केली. रविवारी रात्री उशिरा जयपूरमधील सर्वात मोठ्या एसएमएस रूग्णालयात आगीचा भडका उडाला अन् शहरात एकच खळबळ उडाली. ट्रॉमा सेंटर आणि ICU मध्ये २४ रूग्णांवर उपचार सुरू होते, त्यावेळी आगीचा भडका उडाला. रूग्णांना तातडीने हलवण्यात आले, पण ११ जणांची प्रकृती बिघडली. त्यामधील सहा जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे समोर आलेय. (Jaipur Hospital Fire: 6 Patients Burnt Alive in Midnight ICU Blaze)

रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ट्रॉमा सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून कुलिंगचे काम सुरू आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून त्याचा तपास केला जात आहे. आयसीयू वॉर्डच्या स्टोअरमध्ये आगीचा भडका उडाला होता. पेपर, आयसीयूचे सामान अन् ब्लड सॅम्पलच्या ट्यूबमध्ये आग लागली होती. त्यामुळे आयसीयूमध्ये विषारी धूराने तयार झाला होता.

jaipur sms hospital icu fire 2025 full details
पत्नीच्या निधनाचा धक्का, पतीनेही प्राण सोडले; एकाच वेळी अंत्यसंस्कार, साऱ्या गावाच्या डोळ्यात पाणी

सगळं काही होत्याचे नव्हते झाले -

ट्रॉमा सेंटर आणि ICU मध्ये एकूण २४ रूग्णांवर उपचार सुरू होते. यामधील अनेकांची प्रकृती अतिशय गंभीर होती. आग लागल्याचे समजताच रूग्णांना इतर ठिकाणी हलवण्यात आले. पण या कालावधीत ११ जणांची प्रकृती अधिकच बिघडली. यामधील सहा जणांचा जागेवरच गुदमरून मृत्यू झाला. आग इतकी भयानक होती की रूग्णालयातील तो वॉर्ड पूर्णपणे जळून खाक झाला.

jaipur sms hospital icu fire 2025 full details
Home Remedy : उंदराला घरातून पळवण्याचा एकदम सोपा उपाय, फक्त एक बिस्टिक अन्...

ICU मध्ये उपचार घेणार्‍या रूग्णांच्या कुटुंबियांनी रूग्णालयावर बेजबाबदारपणाचा आरोप लावलाय. रूग्णालयात आग लागल्यानंतर जिकडे तिकडे धूर झाला होता. पण त्यावेळी वॉर्ड बॉय अन् दुसरा स्टाफ उपस्थित नव्हता. रूग्णांना तात्काळ इतर ठिकाणी हलवण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. कुटुंबियांनी स्वत:च आगीच्या ठिकाणाहून रूग्णांना हलवले. यामध्ये सहा जणांचा गुदमरून मृत्यू झाला.

jaipur sms hospital icu fire 2025 full details
सिक्किमचा संपर्क तुटला; भलामोठा पूल कोसळला, राष्ट्रीय हायवे बंद, १७ जणांचा मृत्यू

मृताच्या कुटुंबियांना ५-५ लाखांची मदत

जयपूरमधील एसएमएस रूग्णालयातील आगीची घटना मिळताच मुख्यमंत्र्‍यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. भजनलाल यांनी घटनास्थळाची पाहणी केली, त्यावेळी मंत्री जवाहर बेधम त्यांच्यासोबत होते. मुख्यमंत्री भजनलाल यांनी या घटनेबाबत तीव्र शब्दात दुख व्यक्त केले. त्याशिवाय मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५-५ लाख रूपयांच्या मदतीची घोषणा केली. तर जखमींचा उपचार मोफत दिला जाईल, असेही सांगितले. एसएमएस रूग्णालयातील आगीच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, असेही निर्देश त्यांनी दिले आहेत.

jaipur sms hospital icu fire 2025 full details
सरकारी शिक्षकाचा 'सुकन्या'च्या नावाखाली घोटाळा, १५००० जणांना तब्बल १५० कोटींचा चुना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com