सरकारी शिक्षकाचा 'सुकन्या'च्या नावाखाली घोटाळा, १५००० जणांना तब्बल १५० कोटींचा चुना

Government Teacher Dupes : सरकारी शिक्षकाने बायकोच्या नावावर बनावट कंपन्या स्थापन करून १५ हजार लोकांना कोट्यवधींचा चुना लावलाय. देहारादूनमधील शिक्षकाने तब्बल १५० कोटींचा घोटाळा केल्याचे समोर आलेय. सुकन्या समृद्धीसारख्या योजनामध्ये नफ्याचे आमिष दाखवत होता.
share market scam
market Saam TV
Published On

Government teacher 150 crore Sukanya scam : सरकारी शिक्षकाने केलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा समोर आलाय. देहरादूनमध्ये एक सरकारी शिक्षकाने तब्बल १५ हजार लोकांना चुना लावलाय. चार वर्षांमध्ये तब्बल १५० कोटींचा व्यावहार झाल्याचे उघड झालेय. धक्कादायक म्हणजे, सरकारी शिक्षकाने बायकोच्या नावावर तीन ते चार बनावट कंपन्याची स्थापना केली होती. त्या कंपनीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना 'सुकन्या समृद्धी'सारख्या योजनामध्ये नफ्याचे आमिष दाखवून लुबाडत होता. ही घटना समोर आल्यानंतर देहरादूनमध्ये एकच खळबळ उडाली असून जिकडे तिकडे याचीच चर्चा सुरू आहे. एसएसपी अजय सिंह यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू केली आहे. त्यांनी या प्रकरणासाठी एक चौकशी पथकाची स्थापना केली आहे.

'सुकन्या'सह इतर योजनेत नफ्याचे आमिष

सरकारी शिक्षकाने बायकोच्या नावावर बनावट कंपनी स्थापन करत लोकांना सरकारी योजनेतील नफ्याचे आमिष दाखवले. शनिवारी पीडित लोकांनी मायक्रो फायनेन्स इंडिया असोसिएशन कंपनी, दून समृद्धी निधी लिमिटेड कंपनी आणि इन्फ्राटेक कंपनी विरोधात तक्रार दाखल केली. संतप्त जमावाने एसएसपीकडे याबाबत व्याथा मांडल्या. या कंपन्यांची स्थापना २०२१ मध्ये झाली होती. त्यावेळी लोकांना आरडी, एफडी, मासिक गुंतवणूक, सुकन्या योजनासारख्या सरकारी योजनामध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवले. मुदत संपली तर मूळ पैसेही कंपनीने माघारी दिले नाहीत. या कंपनीचा मुख्य संचालक फरार आहे. आरोपी सरकारी शिक्षक असून तो दूनमध्ये कार्यकरत होता. शिक्षकाने पत्नी आणि कुटुंबियांच्या नावाने कंपन्यांची स्थापना केली होती.

share market scam
NCP clash Pune : पुण्यात राष्ट्रवादीत राडा, शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की, अजित पवारांच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप

महिल्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर -

जास्त परताव्यासाठी अनेकांनी कष्टाचे पैसे गुंतवले पण सरकारी शिक्षकाने चुना लावले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ५० पेक्षा अधिक महिलांनी शनिवारी एसएसपीची भेट घेतली. काही जणांच्या पाहुण्यांनी अन् ओळखीच्या लोकांनीही या योजनेत पैसे लावले होतेत. काबाड कष्ट करून मिळवलेले पैसे लुबाडल्याचे समजताच अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. शनिवारी महिलांनी एसपीपुढे आपले दुख व्यक्त केले. कुटुंबात कुणालाही न सांगता आम्ही पैसे गुंतवल होते, आता काय उत्तर देऊ.. असा सवाल महिलांनी उपस्थित केलाय.

share market scam
Mumbai : एकतर्फी प्रेमातून विक्रृती, महिलेचं स्नॅपचॅट हॅक केलं अन् इंस्टावर अश्लील व्हिडीओ....

आरोपींच्या मुले

लोकांनी एसपीला सांगितले की, आरोपीला दोन मुले असून ते उत्तराखंडमधील एका शाळेत डॉक्टरीचे शिक्षण घेत आहेत. एसपीने तक्रार कऱणाऱ्या महिलांचे गाऱ्हाणे ऐकूण घेत कारवाईचे आश्वासन दिलेय. लोकांनी आपली व्यथा पोलिसांसमोर व्यक्त केली. अनेकांनी तर लोन घेऊन आरोपीकडे गुंतवणूक केली होती. आपण गुंतवलेले पैसे घेऊन आरोपी पसार झाल्याचे समजातच त्यांच्या पायाखालची वाळू निसटली आहे.

share market scam
Property Rule : प्लॉट असणाऱ्यांनो सावधान! १२ वर्षात घर नाही बांधलं तर हातून जाणार जमीन, कठोर कारवाई नेमकी का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com