Mumbai : एकतर्फी प्रेमातून विक्रृती, महिलेचं स्नॅपचॅट हॅक केलं अन् इंस्टावर अश्लील व्हिडीओ....

Mumbai Cyber Crime : बोरीवलीतील महिलेचं स्नॅपचॅट अकाउंट हॅक करून इंस्टाग्रामवर अश्लील व्हिडीओ अपलोड करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली. एकतर्फी प्रेमातून सूडबुद्धीने आरोपीने गुन्हा केला असल्याचं समोर आलं आहे.
Crime
Crime Saam Tv
Published On

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Mumbai Snapchat hack case news : सोशल मीडियाचा गैरवापर करून महिलांचा छळ करण्याचे प्रकार वाढत आहेत. अशाच प्रकारे महिलेचे स्नॅपचॅट अकाउंट हॅक करून त्यावरून फोटो आणि व्हिडिओ डाऊनलोड करत महिलेच्या नावाने instagram अकाउंट सुरू करून महिलेची बदनामी करणाऱ्या आरोपीला बोरीवली पोलिसांनी कर्नाटक येथून अटक केली आहे. पवनकुमार धर्मारेड्डी (28 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याने यापूर्वी देखील याच महिलेची सोशल माध्यमातून बदनामी केल्यामुळे त्याला अटक झाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर रोजी बोरीवलीतील महिलेच्या घरी असताना आरोपीने तिच्या परवानगीशिवाय सोशल मीडियावर अश्लील व्हिडीओ अपलोड करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला. पीडित महिले कडून आरोपीला वारंवार समजवण्यात आल्यानंतर देखील आरोपीने अशाप्रकारे बोगस इंस्टाग्राम अकाउंट वरून फोटो व्हायरल करत छळ सुरूच ठेवला होता.

Crime
NCP clash Pune : पुण्यात राष्ट्रवादीत राडा, शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की, अजित पवारांच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप

याप्रकरणी महिलेने बोरिवली पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 78, 75,(2),356(2) आणि आयटी कलम 66(इ), 67 या नुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक माधुसूदन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मिलिंद नागपूर, पीएसआय प्रेमानंद टिकम, पोलीस शिपाई संतोष देसाई व अनिकेत लगस यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून आरोपीचा शोध लावला.

Crime
Nagpur : नागपुरातील बिझनेसमन अन् पत्नीचा इटलीत मृत्यू, फिरायला गेल्यावर काळाचा घाला

आरोपी बेल्लारी जिल्ह्यातील आपल्या मामाच्या घरी लपल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिस तपासात आरोपी महिलेवर एकतर्फी प्रेम करत असल्याचे समोर आले आहे. तिने त्याचा प्रस्ताव नाकारल्यानंतर सूडबुद्धीने हा छळ सुरू केल्याचे उघड झाले. त्याच्यावर भारतीय दंड विधान आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांचा इशारा :

“सोशल मीडियाचा गैरवापर करून महिलांना त्रास देणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. आरोपी यापूर्वीही अशा प्रकारे अटक झाला असून, तरीही त्याने पुन्हा गुन्हा केला आहे. अशा गंभीर प्रकरणांत कठोर कारवाई केली जाईल,” असे बोरीवली पोलिसांनी स्पष्ट केले.

Crime
Sandhya Shantaram : मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा, पिंजरा फेम संध्या शांताराम यांचं निधन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com