सिक्किमचा संपर्क तुटला; भलामोठा पूल कोसळला, राष्ट्रीय हायवे बंद, १७ जणांचा मृत्यू
Darjeeling Bridge Collapse : पश्चिम बंगालमध्ये वादळी पावसामुळे हाहाकार उडालाय. पावसाच्या रौद्र अवतारामुळे भलामोठा पूल कोसळलाय. त्यामुळे सिक्किम अन् दार्जिलिंगचा संपर्क तुटलाय. राष्ट्रीय महामार्ग बंद पडलेत, इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. जनजीवन विस्कळीत झालेय. दार्जिलिंगमध्ये भूस्खलन अन् अतिवृष्टीमुळे आतापर्यंत राज्यात १७ जणांचा जीव गेलाय. तर अनेकजण अद्याप बेपत्ता आहेत. जलपाईगुडी, सिलीगुडी, कूचबिहारमध्ये पूरस्थिती झाली आहे. पावसामुळे पर्यटन केंद्र बंद करण्यात आली आहेत. सरकारी अधिकार्यांच्या अंदाजानुसार, पावसाची स्थिती अन् भूस्खलनामुळे मृताची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगाल आणि सिक्किममध्ये पावसाने तांडव घातलाय. त्यामुळे नद्या-नाल्या भरून दुतोंडी भरून वाहत आहेत. घरांचे नुकसाने झालेय. अनेकांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. दार्जिलिंग आणि सिक्किमला जोडणारा पूल अचानक कोसळला. त्यामुळे दोन्हीचा संपर्क तुटला आहे. दार्जिलिंगमध्ये अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत. पावसामुळे अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
अनेक भागांत पूरग्रस्त परिस्थिती
पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी, सिलीगुडी आणि कूचबिहार येथे मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांत पाणी साचल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. या भीषण पूरस्थितीमुळे दार्जिलिंग आणि सिक्कीममधील अनेक पर्यटनस्थळेही बंद करण्यात आली आहेत.
दुधिया लोखंडी पूल वाहून गेला
उत्तर बंगालमध्ये सततच्या पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. दार्जिलिंग जिल्ह्यातील मिरिक येथे भूस्खलनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला, तर दुधिया लोखंडी पुलाचा एक भाग वाहून गेल्याने सिलीगुडी आणि मिरिक यांचा संपर्क तुटला आहे. कार्सियांग आणि कालिम्पॉंग येथेही भूस्खलन झाले आहे. पाऊस, भूस्खलन आणि त्याच्याशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत सहा जणांच्या मृत्यूची नोंद आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यातही अडचणी येत आहेत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.